नवी दिल्ली: करोना व्हायरमुळे स्थगित झालेल्या स्पर्धा आता पुन्हा सुरू होत असल्या तरी अद्याप त्याला गती आलेली नाही. फुटबॉल, क्रिकेट आणि अन्य काही स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरी प्रेक्षक नसल्यामुळे सामन्यातील उत्साह आणि ऊर्जा कमी झाली आहे. अशातच सोशल मीडियावर क्रीडा क्षेत्राशी संबंधित एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

कंपनीची एक नवी जाहिरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासात इतका व्हायरल झाला की तो पाहिलेल्यांची संख्या १ कोटी पेक्षा अधिक झाली आहे. नायकेच्या या जाहिरातीने एक नवा विक्रम तयार केला असून त्याने नायकेच्या सर्व जुन्या जाहिरातांना मागे टाकले आहे.

वाचा-

कंपनी नेहमीच त्याच्या उत्पादनांची हटके पद्धतीने जाहिरात करत असते. आता जी जाहिरात व्हायरल होत आहे ती नायकेच्या कोणत्याही उत्पादनाची नाही तर क्रीडा क्षेत्रातील ऊर्जेची आहे. या जाहिरातीचे नाव ‘You can’t Stop Us’ असे नाव असून त्याची निर्मिती विडेन आणि केनेडी पोर्टलँन्ड यांनी केली आहे.

लोकांना ही जाहिरात प्रचंड आवडली असून ते याचा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून काहीही झाले तर तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही, असा संदेश दिलाय. एक मिनिट ३० सेंकदाच्या या जाहिरातीत अनेक विविध खेळातील स्टार खेळाडू आणि जगातील दिग्गज संघांचा समावेश केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ देखील या जाहिरातीत दिसतोय.

व्हिडिओतून धैर्य राखण्याचे आणि आशा कामय ठेवण्याचा संदेश सांगितला आहे. संपूर्ण जाहिरातीत ३६ खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. तर तब्बल ४ हजार व्हिडिओ फुटेजचा वापर करून तो पूर्ण करण्यात आला आहे. ट्विटवर हा व्हिडिओला एका दिवसात १ कोटीपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here