नवी दिल्ली: करोना व्हायरस लॉकडाऊनमुळे भारतात क्रिकेट सामने मार्च महिन्यापासून स्थगित करण्यात आले आहेत. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व सामने स्थगित आहेत. आता बीसीसीआयने बहुप्रतिक्षित अशी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा १३वा हंगाम युएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आयोजनामुळे फक्त भारतीय क्रिकेट नव्हे तर जागतिक क्रिकेट विश्वात एक उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अशाच बीसीसीआय आयपीएलचा डबल धमाका करणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलसोबत महिलांच्या मिनी () चे आयोजन होते. या स्पर्धेला ज्याला महिला चॅलेंजर असे ही म्हटले जाते. करोना काळात पुरुषांसोबत आता आता बीसीसीआयने महिला आयपीएलचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषांच्या आयपीएल प्रमाणेच महिलांचे आयपीएल सुद्धा युएईमध्ये खेळवले जाणार.

भारतातील करोना परिस्थितीमुळे आयपीएल १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर (फायनल १० नोव्हेंबरला होण्याची शक्यता) या काळात होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केली की महिलांचे आयपीएलचा कार्यक्रम यात फिट होऊ शकतो.

रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक झाल्यानंतर पीटीआयशी बोलताना गांगुलीने सांगितले की, या वर्षी आयपीएल देखील होणार. यात महिलांच्या राष्ट्रीय संघाचा समावेश असेल.

कुलिंग ऑफ पिरियड वाढवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत, असे गांगुलीने सांगितले. सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा मुदत संपली असून ती वाढवण्यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बीसीसीआयच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महिलांचे आयपीएल १ ते १० नोव्हेंबर या काळात आयोजित होण्याची शक्यता आहे. या स्पर्धे आधी एका कॅम्पचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

सध्या बीसीसीआयशी करारबद्ध झालेल्या महिला खेळाडूंचा कॅम्प आयोजित केला जाईल. जो करोनामुळे स्थगित करण्यात आला होता. आम्ही कोणत्याही क्रिकेटपटूच्या आरोग्याशी संबंधित धोका पत्करू शकत नाही, असे गांगुलीने सांगितले. भारतीय महिला संघ ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानंतर आयपीएल आणि मग वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळण्याची शक्यता आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here