दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या लढतींच्या आकडेवारीवर नजर टाकली तर १४३ वडनेत ऑस्ट्रेलियाने ८० लढतीत विजय मिळवला आहे तर भारताला ५३ लढतीत विजय मिळवता आलाय. भारतात झालेल्या वनडे मॅचचा विचार केल्यास ६४ पैकी ३० लढती ऑस्ट्रेलियाने तर २९ लढती भारताने जिंकल्या आहेत.
ही फार जुनी गोष्ट नाही जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारतीय मैदानावर भारताचा पराभव केला होता. २०१९ साली वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३-२ असा पराभव केला होता. तेव्हा पहिल्या दोन लढती जिंकल्यानंतर भारताने मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने २ शतकांसह ५ सामन्यात ३८३ धावा केल्या होत्या. तर भारताकडून विराट कोहलीने ३१० धावा केल्या होत्या, ज्यात २ शतकांचा समावेश आहे.
कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल असे पिच तयार करण्यात आले होते. ज्याचा फायदा टीम इंडियाला झाला. पण वनडेत असे फार वेळा घडत नाही. वनडे मॅच अधिक रोमांचक होण्यासाठी फलंदाजांना अनुकूल असे पिच तयार केले जाते. जेथे फिरकींना जास्त संधी मिळत नाही. अशात भारताला ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करावा लागणार आहे. या शिवाय पहिल्या लढतीत कर्णधार रोहित शर्मा असणार नाही. तो दुसरी आणि तिसरी वनडे खेळणार आहे. सोबत स्टार फलंदाज श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर झाला आहे. आता त्याच्या जागी मधळ्या फळीत एक दमदार खेळाडू निवडावा लागले. गेल्या काही काळात श्रेयसने वनडेत दमदार कामगिरी केली होती.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिली मॅच- १७ मार्च, मुंबई
दुसरी मॅच- १९ मार्च, विशाखापट्टणम
तिसरी मॅच- २२ मार्च, चेन्नई
सर्व सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times