नवी दिल्लीः इंडियन प्रीमियर लीग (IPL) च अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेला अखेर भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर १० नोव्हेंबरला अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. संघांमध्ये २४-२४ खेळाडूंचा समावेश असेल. दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीगच्या संचालन समितीने युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान कोविड -१९ रिप्लेसमेंटला मान्यता दिली. बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या स्पर्धेत १० दुहेरी म्हणजे दिवसातून दोन सामने खेळवले जाणार आहेत. संध्याकाळच्या सामन्यांची सुरुवात साडेसात वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल. आयपीएल स्पर्धा आणखी एक आठवडा पुढे वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. म्हणूनच १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल होणार आहे. कठोर प्रोटोकॉल लक्षात घेता सामन्यांमध्ये चांगले अंतर असेल. यामुळे दिवसातून दोन सामने होतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

‘१० नोव्हेंबरपर्यंत आयपीएल होईल. म्हणूनच पहिल्यांदा विकएंड नाही तर विक डेमध्ये फायनल होत आहे. वाहतूक, बायो-सिक्योरीटी आणि अशा सर्व बाबी लक्षात घेता सामन्यांमध्ये बरेच अंतर ठेवण्यात आले आहे. या हंगामात १० डबल हेडर म्हणजे दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here