अमरावती: घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका तरुणीचे पोलीस कर्मचाऱ्यानेच लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश जगताप (३८) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित २० वर्षीय तरुणीवर शहरातील एका पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात नीलेश हा तिची चौकशी करीत होता. त्याने पीडित तरुणीला मदत करतो, असे म्हणून तिचा विश्वास संपादन केला.

चौकशी दरम्यान तिला स्वतःचा मोबाइल क्रमांक देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली. आपण भेटून बोलू, असे तो म्हणत होता. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर केसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून नीलेशने पीडित तरुणीला छत्री तलाव येथे बोलावले, येथे चर्चा झाल्यानंतर त्याने पुन्हा १० मार्च रोजी केससंदर्भात बोलायचे आहे. आपण चिखलदरा येथे जावून बोलू, असे पीडित तरुणीला म्हटले.

IND vs AUS: वनडे मालिकेत टीम इंडियावर डाव उलटा पडू शकतो; एका गोष्टीमुळे ऑस्ट्रेलिया धोकादायक
त्यानंतर १३ मार्च रोजी नीलेशने पीडित तरुणीला आय लव यू पिलू, उद्या चिखलदरा जावू, खूप मजा करू, रोमांस करू, असा मेसेज केला. दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी नीलेशने पीडित तरुणीला व्हीएमव्ही परिसरात बोलावले. दुचाकीवर मागे बसून नीलेश हा तिला चांदूरबाजार मार्गावर घेऊन गेला. चांदूरबाजार येथून चक्कर मारून येऊ, असे म्हणत त्याने अचानक मार्गात तिला दुचाकी थांबवायला सांगितली.

माझी पेन्शन रद्द करा आणि…; माजी आमदार आडम संपाला पाठिंबा देत केली मोठी मागणी
आपण शेतात जावून बोलू, असे तो पीडित तरुणीला म्हणाला. त्यानंतर नीलेशने पीडित तरुणीला एका शेतात नेले. शेतात त्याने पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने विरोध केल्यावर त्याने तिला गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. त्यानंतर नीलेशने पीडित तरुणीचे लैंगिक शोषण केले. सदर घटनेनंतर पीडित तरुणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नीलेश जगतापविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here