रोहित शर्माने पत्नी रितिकासोबत डान्स फ्लोअरवर जोरदार डान्स केला. रोहितने काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केला. यामध्ये रोहित पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. काळ्या कुर्ता पायजमासह गळ्यात लाल ओढणी घालून पत्नी रितिकासोबत भारतीय कर्णधाराने जबरदस्त डान्स केला आहे.
यादरम्यान या जोडप्याची अप्रतिम जुगलबंदीही पाहायला मिळाली. कुणालच्या लग्नात रोहित मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाहीये. इतकंच नाही तर मुलींच्या गँगच्या फोटोशूटदरम्यानही त्याने खास एन्ट्री केली होती, ज्याचा फोटो रितिकाने शेअर केला होता.
रोहित मस्तीच्या मूडमध्ये
रितिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत आहे. ज्यामध्ये रोहित पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. १९ मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित भारतीय संघात परतणार आहे. यापूर्वी, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ ने जिंकली होती.

कोण आहे रोहितचा मेहुणा
कुणाल सजदेह हा रितिका सजदेहचा भाऊ आणि क्रिकेटर रोहित शर्माचा मेहुणा आहे. तो सध्या इंग्लंडमधील मँचेस्टर येथील डेलॉइटच्या स्पोर्ट्स बिझनेस ग्रुपमध्ये क्रीडा उपक्रम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. याआधी त्याने Nexus Consulting Group – Rotman मध्ये काम केले आहे. कुणालने आपले शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्रातील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून केले आणि नंतर एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथून पदवी प्राप्त केली. एचआर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन जीवनात तो क्रीडा परिषदेचा सदस्य होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times