डब्लिन: भारतीय क्रिकेट संघ या वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. या शिवाय आता टीम इंडियाचा आणखी एक दौरा समोर आला आहे. ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा १८ ते २३ ऑगस्ट या दरम्यान होईल. याबाबची माहिती क्रिकेट आयर्लंडने दिली आहे.

आयर्लंड क्रिकेट चाहते टी-२० मधील अव्वल संघ असलेल्या भारतीय टीम सोबत खेळाचा आनंद घेण्यास उत्सुक असतील. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू मालाहाइड येथे येतील. भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने गेल्या वर्षी याच ठिकाणी दोन सामन्यांच्या मालिकेचे नेतृत्व केले होते. भारताला या वर्षी वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. अशात बीसीसीआय हार्दिकच्या नेतृत्वाखाली अशी एक मालिका खेळण्याच धोका पत्करेल का ज्याचे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही हा खरा प्रश्न आहे. ही मालिका आयर्लंड क्रिकेट बोर्डासाठी फार महत्त्वाची आहे, कारण याच्या प्रसारणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

चेंडू नव्हे तर आगीचा गोळा; स्टंप ६ फुटावर जाऊन पडली, शमी अखेरच्या १४ चेंडूत पाहा केलं तरी काय
क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन ड्युट्रोम यांनी सांगितले की ‘पुरुष क्रिकेट संघाचा हा हंगाम एखाद्या उत्सवा सारखा असेल. आम्ही आज खात्रीपूर्वक सांगतो की, भारत सलग दुऱ्यांदा आयर्लंडच्या दौऱ्यावर येईल. आमचा संघ या मालिकेआधी बांगलादेश विरुध्द विश्वचषक सुपर लीगच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भाग घेईल. त्याचबरोबर आम्ही आम्ही आधीच घोषणा केल्याप्रमाणे आम्ही लॉर्ड्समध्ये कसोटी सामना आणि नंतर सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुध्द एकदिवसीय मालिका खेळणार आहोत.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम थोडक्यात बचावला; झंजावाती फलंदाजीत…
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात वनडे मालिका खेळत आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या लढतीत भारताने ५ विकेटनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वनडे मालिकेच्या आधी भारताने कसोटी ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे १९ मार्च रोजी विषाखापट्टणम येथे तर तिसरी आणि अखेरची वनडे २२ मार्च रोजी चेन्नईत होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here