नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरूवात १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काउसिलच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात IPLच्या फायनलसह स्पर्धेच्या प्रायोजकासंदर्भात निर्णय झाला.

वाचा-
युएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी चीनी मोबाइल कंपनी व्हीव्होसह अन्य सर्व प्रायोजकांचा करार कामय ठेवण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. तसेच यामुळे करोना संकट असल्यामुळे संघांना कितीही खेळाडू बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होईल. याआधी स्पर्धेची फायनल मॅच ८ नोव्हेंबर रोजी होणार होती. स्पर्धा युएईमधील दुबई, शारजाह आणि अबुधाबी या तीन ठिकाणी होईल.

या वर्षी एका दिवशी दोन सामने असलेले १० दिवस असतील. संध्याकाळी सुरू होणारे सामने भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता सुरू होतील. या बैठकीत केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून एका आठवड्यात परवानगी मिळेल असा विश्वास व्यक्त केला गेला.

वाचा-
पुरुषांच्या सोबत या वर्षी महिलांच्या मिनी आयपीएल (Women’s T20 Challenge) चे आयोजन होते. या स्पर्धेला ज्याला महिला चॅलेंजर असे ही म्हटले जाते. करोना काळात पुरुषांसोबत आता आता बीसीसीआयने महिला आयपीएलचा निर्णय घेतला आहे. महिलांचे आयपीएल १ ते १० नोव्हेंबर या काळात आयोजित होण्याची शक्यता आहे. या स्पर्धे आधी एका कॅम्पचे आयोजित केला जाऊ शकतो.

वाचा-

बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
>> आयपीएलसाठी असलेले सर्व चीनी कंपन्यांचे प्रायोजकत्व कायम
>> १९ सप्टेंबर रोजी पहिला तर १० नोव्हेंबर रोजी फायनल
>> भारतीय वेळानुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार सामना
>> संघात २४ खेळाडू असतील, करोनामुळे हवे तिकते खेळाडू बदलण्याची परवानगी
>> १० डबल हेडर म्हणजे एक दिवशी दोन सामने

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here