मुंबई: महिला प्रीमियर लीगमध्ये एका मागोमाग शानदार खेळी आणि अनेक नवनवीन विक्रम पाहायला मिळत आहेत. या लीगमधील शानदार आणि सर्वात लांबलचक षटकार शनिवारच्या सामन्यात पाहायला मिळाला. आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या वुमन्स प्रीमियर लीगमधील आरसीबीकडून हा भन्नाट षटकार पाहायला मिळाला. शनिवारी स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखालील संघाने असा स्फोटक विजय नोंदवला की क्रिकेटप्रेमी थक्क झाले. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने अवघ्या १५.३ षटकांत विजय मिळवला.

गुजरात जायंट्सने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची फलंदाज सोफी डिव्हाईनने धडाकेबाज खेळी करत धावांचा पाऊस पाडला. डिव्हाईनने अवघ्या ३६ चेंडूत ९ चौकार आणि ८ षटकार मारले तर २७५ च्या स्ट्राईक रेटने ९९ धावा ठोकल्या. तिचे शतक अवघ्या एका धावेने हुकले असले तरी संघाला मोठा विजय मिळवून देण्यात तिने महत्त्वाचे योगदान दिले.
अंतिम सामन्याचा रोमांच! शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज; पुढे काय घडलं पाहा VIDEO
दिग्गज गोलंदाज डिव्हाईनचे झंझावात पाहून सारेच दंग झाले. तिने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे हा षटकार मारून डिव्हाईन स्वतः थक्क झाली होती. चेंडू हवेत फिरताना पाहून तिला आश्चर्य वाटले, जणू तिचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता.

सर्वात लांब षटकार

सामन्याच्या ९व्या षटकात हा दणदणीत षटकार पाहायला मिळाला. तनुजा कंवरने डिव्हाईनकडे चेंडू टाकताच तिने क्रीजवरून पुढे येऊन बॅट सरसावत लांबच्या दिशेने असा षटकार मारला की, स्टेडियममध्ये एकच खळबळ उडाली. डिव्हाईनची हा गगनचुंबी शॉट ९४ मीटर लांब नोंदवला गेला. अशा प्रकारे या फलंदाजाने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम केला.

कॅन्सरवर मात करणारा युवी भेटला ऋषभ पंतला; चाहत्यांना प्रथमच दिसल्या त्या अपघाताच्या जखमा
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एक चौकार लगावला, एवढ्यावरच न थांबता तिने सलग दोन चौकार १ षटकार पुन्हा एक चौकार अशी शानदार फटकेबाजी केली. तत्पूर्वी, डिव्हाईनने दुसऱ्या षटकापासूनच शानदार फटकेबाजी सुरू केली. तिने दुसऱ्या षटकात ६,४,४,६,४ मारून आपली शानदार खेळी दाखवून दिली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here