विशाखापट्टणम: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा निराश केलं आहे. सूर्याचे ते दमदार शॉट्स पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहिली. कारण दुसऱ्या वनडे सामन्यातही सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर आऊट झाला. पहिल्याच चेंडूवर तो मिचेल स्टार्कचा बळी ठरला. पहिल्या वनडेप्रमाणेच दुसऱ्या वनडेतही स्टार्कने पहिल्याच चेंडूवर सूर्याला एलबीडब्ल्यू केले. बाद झाल्यानंतर सूर्या अत्यंत निराश होऊन परतला. सूर्याच्या रूपाने भारताला या सामन्यात तिसरा मोठा धक्का बसला आहे.

IND vs AUS: रोहितची संघात एन्ट्री आणि टीम इंडियामध्ये झाले दोन मोठे बदल, पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन
अशातच सूर्यकुमार यादव बाद

वास्तविक, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी पाचवे षटक टाकले. हे षटक भारतासाठी खूपच घातक ठरले. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले. रोहित शर्माने मारलेला शॉटचा स्मिथने शानदार झेल टिपला आणि भारताचा कर्णधार पुन्हा तंबूत परतला. टीम इंडियाला एका चांगल्या धावसंख्येची गरज असताना सूर्याकडून संघाला कोहलीसोबत चांगल्या पार्टनरशिपची अपेक्षा होती. पण तेवढ्यात स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर सूर्या LBW आऊट झाला. स्टार्कचा चौथा चेंडू आत आला, ज्यावर सूर्या काहीच करू शकला नाही. अपील झाल्यावर अंपायरने बोट वर केले आणि सूर्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाइव्ह मॅच स्कोअर

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने १५ षटक संपेपर्यंत ५ गडी गमावून ७० धावा केल्या आहेत. विराट कोहली २२ धावांवर, तर हार्दिक पंड्या १ धावा करत बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा १३, गिल ०, सूर्यकुमार यादव ० आणि केएल राहुल ९ धावा करून बाद झाले आहेत. यातील चार विकेट स्टार्कने घेतल्या आहेत. तर हार्दिक पांड्याची विकेट अबॉटला घेण्यात यश आले. सध्या मैदानात विराट कोहली आणि जडेजाची जोडी भारताची कमान सांभाळत आहे.

अंतिम सामन्याचा रोमांच! शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज; पुढे काय घडलं पाहा VIDEO

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here