मुंबई: आयपीएलच्या १३ व्या हांगामाची जोरदार तयारी बीसीसीआयकडून सुरू आहे. काल रविवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने IPL संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. ज्यात चीनी कंपनीचे प्रायोजकत्व कायम ठेवणे, खेळाडू बदलण्याची परवानगी तसेच फायनल मॅच ८ ऐवजी १० नोव्हेंबर घेण्याचा निर्णय झाला.

आयपीएलच्या आयोजनात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो खेळाडू, स्टाफ, अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांची सुरक्षेचा होय. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत तयार करण्यात आले. यामुळे ही मालिका यशस्वी झाली आणि सर्व खेळाडूंचे आरोग्य देखील सुरक्षित राहिले.

वाचा-
आता बीसीसीआयने आयपीएलचे शिवधनुष्य उचलले आहे. यात फक्त भारतातील नाही तर जगभरातील खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल. यासाठी टाटा ग्रुपच्या आरोग्य विंगने जी सध्या करोना व्हायरसच्या काळात सुरक्षा सेवा देत आहेत त्यांनी बीसीसीआयला सेवा देण्याची तयारी दाखवली आहे.

आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. स्पर्धेचा हा १३वा हंगाम करोना व्हायरसनंतर क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. टाटा मेडिकर अॅण्ड डायग्नोस्टिकची या स्पर्धासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित वातावरण तयार करून देण्याची तयारी आहे.

वाचा-
यासाठी टाटा ग्रुपने एक प्रजेंटेशन देखील तयार केले आहे. ज्यात बायो सिक्योर वातावरण तयार करणे आणि ते कायम ठेवण्यासाठीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे युएईमध्ये होणारी स्पर्धा सुरक्षित पणे पार पडेल.

आयपीएल मधील अधिक तर संघ चालकांनी आणि लीग संदर्भातील काही घटकांनी टाटाची सेवा मिळाली तर त्याबद्दल आनंदच असेल असे म्हटले आहे. भारतातील प्रतिष्ठीत कंपनी अशा प्रकारची सेवा देणार असेल तर तिचा चर्चा उत्तमच असेल. यामुळे आयपीएलवरील विश्वास आणखी वाढले.

वाचा-
टाटाच्या या प्रस्तावावर बीसीसीआय या आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. या ग्रुपने जो प्रस्ताव तयार केला आहे त्याच लीगला पूर्ण सुरक्षा देण्याची तयारी आहे. याच चाचणीसह सर्व गोष्टींचा समावेश आहे.

आणि भारताची मेडिकल आणि डायग्नोस्टिक टीम कोव्हिड सेफ्टी मॅनेजमेंटसाठी बीसीसीआय, फ्रॅचाइसी, आयपीएल इव्हेंट मॅनेजमेंट टीम आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (UAECB)याच्या सहकार्याने काम करणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here