नवी दिल्ली: भारतीय भूमीवरच टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून १० विकेट्स राखून मानहानीकारक पराभव झाला. विशाखापट्टणम येथे हा दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा पराभव भारतीय संघाला नक्कीच बराच काळ आठवण करू देत रहाणार आहे, कारण २०२३चा एकदिवसीय विश्वचषक या वर्षी भारतातच होणार आहे. विश्वचषकाची तयारी करत असताना अशा प्रकारे फलंदाजी बाजू कोलमडली आहे एकही फलंदाज मैदानात जास्त काळ टिकू शकीला नाही. यामुळे आता प्रश्नांचा भडीमार नक्कीच होत आहे. पण ही अशी घटना टीम इंडियासोबत काही पहिल्यांदा घडली नाही.

टीम इंडियाची सर्वात मजबूत मानली जाणारी फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी अनेकदा ठरली आहे. विशाखापट्टणममध्ये त्यांनी ११७ धावा केल्या होत्या, पण एकदिवसीय इतिहासात असे ७ वेळा घडले आहे; जेव्हा टीम इंडियाने १०० धावांचा आकडाही गाठू शकली नव्हती. कसोटीत त्यांची सर्वात कमी धावसंख्या ३६ धावा आहे, तर एकदिवसीय सामन्यात हा आकडा ५४ धावांचा आहे.

सूर्याला पहिल्याच चेंडूवर दोन वेळा कसं काय आऊट केलं, सामन्यानंतर समोर आली स्टार्कची रणनिती
गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील संघ ५४ धावांवर ऑल आऊट

२९ ऑक्टोबर २००० रोजी भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळवला जात होता. सौरव गांगुली यावेळेस संघाचा कर्णधार होता. तेव्हा भारतीय संघ केवळ ५४ धावांवर ऑल आऊट झाला होता. या सामन्यात भारताकडून फक्त एका फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला होता. शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघ २६.३ षटकात ऑल आऊट झाला. ही त्यांची वनडे इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याशिवाय भारतीय संघ ६३, ७८, ७९, ८८, ९१ आणि ९२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. म्हणजेच ७ प्रसंग असे आले जेव्हा भारत तीन अंकी आकडयापर्यंत पोहोचू शकला नाही.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

Video: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून तिरंग्याचा अपमान; होऊ शकते ३ वर्षाचा तुरुंगवास आणि दंड
पाहूया कोणत्या संघांविरोधात भारताला १०० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

भारताची धावसंख्या विरूध्द संघ ठिकाण कधी
५४ धावा श्रीलंका शारजाह २९ ऑक्टोबर २०००
६३ धावा सिडनी ८ जानेवारी १९८१
७८ धावा श्रीलंका कानपूर २४ डिसेंबर १९८६
७९ धावा पाकिस्तान सियालकोट १३ ऑक्टोबर
८८ धावा न्यूझीलंड दांबुला १० ऑगस्ट २०१०
९१ धावा दक्षिण आफ्रिका डर्बन २२ नोव्हेंबर २००६
९२ धावा न्यूझीलंड हॅमिल्टन ३१ जानेवारी २०१९

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here