भारताने या मैदानावर एकूण १४ वनडे खेळल्या आहेत. त्यापैकी ७ मध्ये विजय तर ५ मध्ये पराभव झाला आहे. भारताला वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी २ वेळा तर ऑस्ट्रेलियाने एकदा या मैदानावर पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास त्यांनी चेपॉकवर ५ वनडे खेळल्या असून त्यापैकी फक्त एका लढतीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर भारतासह झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केलाय.
कसे आहे पिच
चेन्नईतील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. मैदानावर गवत असेल आणि आउटफिल्ड देखील जलद असेल. पण उद्याच्या मॅचवर पावसाची शक्यता आहे आणि जर तसे झाले तर आउटफिल्डवर परिणाम होऊ शकतो. दिल्ली आणि विशाखापट्टणम प्रमाणे येथे देखील जलद गोलंदाजांना मदत मिळेल पण चेंडू बॅटवर येईल. चेंडू जुना झाल्यावर फिरकी गोलंदाजांना विकेट मिळवता येईल.
टॉस किती महत्त्वाचा?
चिदंबरम मैदानावरील रेकॉर्ड पाहता येथे दोन्ही डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. ३१ पैकी १५ लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या तर १६ लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३० तर सर्वोच्च धावसंख्या २००७ मध्ये टीम इंडियाने ३३७ केली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times