जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. नुकतीच जर्मनीमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झआली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानात उतरण्यासाठी ६-७ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. यामुळे तो आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ आणि वनडे विश्वतषकामधून बाहेर झाला आहे. जेव्हा रोहित शर्माला त्याच्याबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की ‘बुमराह गेल्या ८ पेक्षा जास्त महिन्यांपासून बाहेर असल्याने प्रेक्षकांना आणि संघाला त्याच्याशिवाय खेळण्याची सवय झाली आहे. तरीसुध्दा बुमराहची जागा भरून काढणे खूप अवघड आहे. आम्हाला माहित आहे की तो किती अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे’.
विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन
रोहित शर्मा पुढे म्हणाला कि ‘आम्हाला पुढे जायचं आहे आणि घेतलेली जबाबदारी खूप छान प्रकारे पार पाडत आहेत. संघाला मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्या व्यतिरिक्त उमरान मलिक आणि जयदेव उनादकटही भेटले आहेत’.
सध्या दुसऱ्या सामन्यात पदरी पडलेल्या पराभवासाठी रोहितने फलंदाजांना जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्या मते जर फलंदाजांनी चांगली खेळी खेळली असती तर कदाचित निकाल भारताच्या बाजूने लागला असता. तो म्हणाला की, दुसऱ्या वनडे सामन्याची खेळपट्टी अनुकूल होती मात्र आम्ही विरोधी संघापुढे मोठं लक्ष्य ठेवण्यास आम्ही अयशस्वी ठरलो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times