खेळाडूंबाबत बीसीसीआयमध्ये काही काळ अनागोंदीचा कारभार होता. त्याचबरोबर काही क्रिकेटपटू बीसीसीआयला फसवत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे बीसीसआयने आता कडक पाऊल उचलले असून जर खेळाडूने बीसीसीआयला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे थेट निलंबन करण्यात येणार आहे.
याबाबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, ” सर्वांसाठी नियम सारखए असावेत आणि चांगले क्रिकेट खेळले जावे, यासाठी बीसीसीआय कटीबद्ध आहे. काही खेळाडू बीसीसीआयला फसवत असल्याचेही समोर आले आहे, या खेळाडूंना बीसीसीआय माफ करणार नाही. या खेळाडूंचे निलंबन करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे आणि त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यापुढे कुणीही वाईट कृत्य कराययला धजावणार नाही.”
बीसीसीआयला काही खेळाडू वयचोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर काही क्रिकेटपटूंनी आपल्या राहण्याचे, जन्माचे ठिकाणही बदलल्याचे पाहायला मिळाले. काही जणांनी बनावट जन्मदाखलेही बीसीसीआयला सुपूर्द केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे वयोगटातील क्रिकेटसाठी मोठी समस्या उभी राहते. त्यामुळे याबाबत आता बीसीसीआयने कडक पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे.
बीसीसीआय काय शिक्षा करणार…
एखाद्या खेळाडूने बनावट जन्माचा दाखला दिला किंवा आपल्या जन्माबाबत जर कोणतीही गोष्ट बीसीसीआयपासून लपवली, तर त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई बीसीसीआय करणार आहे. दोषी क्रिकेटपटूचे दोन वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या मोसमात क्रिकेटपटूंना आपली कागदपत्रे बीसीसीआयला सुपूर्द करायची आहेत. ही कागदपत्रे बनावट निघाली तर बीसीसीआय त्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी आणी शकते. ही दोन वर्षांची बंदी उठल्यावर खेळाडूला आपला खरा जम्न दाखला बीसीसीआयला द्यावा लागणार आहे. त्यानंतर हा खेळाडू खेळू शकणार की नाही, याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला फसवणाऱ्या खेळाडूंचे धाबे दणाणले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
bookmarked!!, I like your blog!
A big thank you for your article.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.