भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर बरेच विश्वविक्रम आहेत. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब आफ्रिदीने सचिनची बॅट वापरून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही, पण याबाबतचा एक खुलासा माजी क्रिकेटपटूनेच केला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहीलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवणेही बंद केले आहे. पण खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा त्यांच्यामध्ये द्वेष नसून खेळभावना असते आणि हीच गोष्ट सचिनच्या बाबतीतही पाहायला मिळाली आहे.

ही गोष्ट आहे १९९६ सालची. जेव्हा पाकिस्तानचा फिरकीपटू मुश्ताक अहमद हा जखमी झाला होता. त्यावेळी आफ्रिदी हा पाकिस्तानच्या युवा संघाबरोबर वेस्ट इंडिजमध्ये सामने खेळत होता. पण मुश्ताक जखमी झाल्यावर आफ्रिदीला ऐरोबी येथे बोलावण्यात आले आणि त्यावेळीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी आफ्रिदीने सचिनची बॅट वापरून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने एक विश्वविक्रम रचला होता. आफ्रिदीने या सामन्यात फक्त ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावण्याचा विश्वविक्रम रचला होता. पण या खेळीमध्ये आफ्रिदीने सचिनची बॅट वापरल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबतचा खुलासा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर मेहमूदने केला आहे.

याबाबत मेहमूद म्हणाला की, ” आफ्रिदीने जेव्हा शतकाचा विश्वविक्रम रचला होता, तेव्हा त्याने सचिन तेंडुलकरची बॅट वापरली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने हा विश्वविक्रम केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुवितरणासारखे धडाकेबाज फलंदाज होते. त्यावेळी पाकिस्तानकडे असा फलंदाज नव्हता, त्यामुळे आफ्रिदीने सचिनची बॅट वापरली होती आणि त्यानंतर त्याने विशविक्रम रचला होता.”

आफ्रिदीकडे कशी आली सचिनची बॅट…
आफ्रिदीने सचिनच्या बॅटने विश्वविक्रम रचला. पण आफ्रिदीकडे सचिनची बॅट आली तरी कशी, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. यावर मेहमूद म्हणाला की, ” माझ्यामते त्यावेळी सचिनची एक बॅट पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसकडे होते. त्यामुळे आफ्रिदीला सचिनची बॅट ही वकारने दिली होती.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here