आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ चॅम्पियन बनेल, असा विश्वास ब्रेट लीने वर्तवला आहे. डब्ल्यूटीसी फायनलबद्दल स्पोर्ट्स यारीशी बोलताना ली म्हणाला ऑस्ट्रेलिया जिंकेल. तो म्हणाला, ‘भारत चांगला संघ आहे पण सामना ओव्हलवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाला तेथील परिस्थिती अधिक मानवेल. त्यामुळे माझं मत ऑस्ट्रेलिया आहे. २०२१ मध्येही टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात त्याला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
वनडेमध्ये टीम इंडिया…
ब्रेट लीने आयसीसी विश्वचषकासाठी भारताला आवडता संघ म्हटले तो म्हणाला- विश्वचषकात भारताला भारतात हरवणे कठीण होईल. भारताला येथील परिस्थिती चांगली माहीत आहे, त्यामुळे मला वाटते की भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.
पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गेल्या तीन वेळा यजमान देश चॅम्पियन बनला आहे. २०११ मध्ये भारताने मुंबईत विजेतेपद पटकावले होते. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया यजमान होता आणि चॅम्पियनही झाला होता. २०१९ मध्येही हीच परिस्थिती होती. इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली होती. आता पुन्हा एकदा ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. कदाचित याच कारणामुळे ब्रेट ली भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
You there, this is really good post here. Thanks for taking the time to post such valuable information.
online gambling in the philippines why is it popular