बीसीसीआयने आयपीएलसाठी चांगलीच कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स या संघाला मोठा झटका दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता धोनीच्या संघाला युएईमध्ये एक काम करता येणार नसल्याचे आता समोर आले आहे.

यावर्षीची आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला युएईच्या सरकारचे काही नियम पाळावे लागणार आहेत. आयपीएल हे सप्टेंबर महिन्यात सुरु होणार असले तरी या स्पर्धेत काही कडक नियम बनवले जाणार आहेत.

आयपीएल ही दोन महिन्यांची मोठी स्पर्धा असते. त्यामुळे खेळाडूंना त्यासाठी फिटनेसवर जास्त भर द्यावा लागतो, त्याचबरोबर भरपूर सरावही करायला लागतो. सध्याच्या घडीला खेळाडू घरातच बसून आहेत, त्यामुळे ते मैदानातील सरावापासून सध्याच्या घडीला लांब आहेत. त्यामुळे खेळाडूंना या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे.

आयपीएलसाठी युएईमध्ये सर्वात लवकर पोहोचणारा संघ हा चेन्नई सुपर किंग्स होता. कारण मार्च महिन्याच्या अखेरीस जेव्हा आयपीएल सुरु होणार होती. तेव्हा चेन्नईचा संघ फेब्रुवारी महिन्यापासून सरावाला लागला होता. यावेळीही चेन्नईचा संघ आयपीएलसाठी युएईमध्ये १० ऑगस्टला पोहोचणार होता. पण आता त्यांना एक मोठा झटका बीसीसीआयने दिल्याचे पाहायला मिळत आहे.

चेन्नईला सराव करण्यासाठी युएईमध्ये १० ऑगस्टला जायचे होते. कारण चेन्नईचा संघ मैदानात उतरून १५ ऑगस्टपासून सराव करणार होती. पण आता त्यांना बीसीसीआयने धक्का दिला आहे. आता चेन्नईच्या संघाला २० ऑगस्टपर्यंत तरी युएईमध्ये जाता येणार नाही. त्यामुळे आता त्यांना २० ऑगस्टनंतरच युएईमध्ये जावे लागेल आणि त्यानंतरच सराव करावा लागेल.

आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. आयपीएलच्या प्रत्येक संघात ३०-३५ खेळाडू असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर १०-१५ जणांचा सपोर्ट स्टाफ असतो. त्यामुळे ही संख्या ५० पर्यंत जाते. यावेळी आपल्या बायकांनादेखील युएईतील आयपीएलसाठी न्यावे, अशी विनंतीही बीसीसीआयला करण्यात आली आहे. जर प्रत्येक संघातून जवळपास १०० व्यक्ती युएईला जाणार असतील, तर सर्व काही कठीण होऊन बसेल. त्यामुळे बीसीसीआयने सर्वच संघांच्या मालकांना खेळाडूंची संख्या कमी करण्यासाठी विनंती केली आहे.

ही स्पर्धा भारतात असली असती तर खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा आली नसती. पण ही स्पर्धा युएईमध्ये होणार असून त्यासाठी जास्त खर्च होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी खर्च आणि जोखीम कमी करण्यासाठी बीसीसीआयने प्रत्येक संघ मालकांना आपल्या संघात २० खेळाडूच ठेवावेत, अशी विनंती केली असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता याचा आयपीएलमधील सामन्यावर किती परीणाम होईल, हे स्पर्धा सुरु झाल्यावर पाहायला मिळेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here