चेन्नई: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी म्हणजेच २२ मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडियाने २०२३ मधील एकही मालिका घरच्या मैदानावर गमावली नाही आहे आणि हा सामना जिंकून ही वनडे मालिका आपल्या नावे करत हा रेकॉर्ड आपल्या नावे असाच ठेवण्याचा प्रयत्न करेल.

या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असला तरी दुसऱ्या वनडेत विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव झाला होता. या सामन्यात मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या. पण टीम इंडिया या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर का गडबडतात, याचे नेमके कारण काय आहे जाऊन घेऊया.

टीम इंडियाचा सलामीवीर आता टीव्ही मालिकेत काम करणार; मिळाली ही खास भूमिका
भारतीय संघ स्टार्कसमोर गडबडला

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. हेच चित्र भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या वनडे सामन्यात पाहायला मिळाले. या दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आतापर्यंत योग्य ठरला आहे. स्टार्क व्यतिरिक्त सीन एबॉटने ३ आणि नॅथन एलिसने २ भारतीय फलंदाजांना आपला बळी बनवले.

वर्षानुवर्षे टीम इंडियाचे फलंदाज डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीला बळी पडत आहेत. असे अनेक सामने आणि अनेक भारताचे महान फलंदाज आहेत ज्यांना डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीचा मारा करता आला नाही त्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले. दुसऱ्या वनडे सामन्यात स्टार्कच्या गोलंदाजीचा मारा इतका तीव्र होता, की फलंदाजांना मैदानावर टिकता आले नाही.

यंदाही WTC जिंकण्याचं स्वप्न राहणार अधुरं? दिग्गज खेळाडूच्या भविष्यवाणीने वाढली भारताची धाकधूक
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर काही वेळेस बॅटने चेंडू कधी फिरवायचा याचा अंदाज येण्याआधीच चेंडू आतमध्ये आलेला असतो. त्यामुळे अनेकदा फलंदाज बाद होण्याच्या संधी देतो. पाकिस्तानचा माजी वेगवान आणि दमदार गोलंदाज वसीम अक्रमने देखील याचे कारण सांगितले आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

वसीम अक्रमच्या मते, डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांचा अँगल खूप वेगळा असतो आणि त्यामुळेच भारतीय फलंदाज अडकतात. स्पोर्ट्स तकवरील संवादादरम्यान तो म्हणाला, ‘भारतीय संघात अनेक महान खेळाडू आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलने शेवटचा सामना जिंकला. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर केवळ भारतीय फलंदाजच अडकतात असे नाही, तर इतर सर्व फलंदाजही पायचीत होतात. याचे कारण म्हणजे डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा अँगल वेगळा असतो. विशेषतः जेव्हा चेंडू आत येतो तेव्हा तो आणखी अवघड होतो. विशाखापट्टणमची खेळपट्टी बघून हा सामना ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये होत असल्याचा भास होत होता. माझ्या मते, चेंडू सीम होता.

यंदा एकदिवसीय विश्वचषक भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे, त्यादृष्टीने तयारी लक्षात घेता ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत चांगली कामगिरी करून विजयाची नोंद करू इच्छितो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here