यावर्षी युएईमध्ये होणारी आयपीएल ही रद्द करा, अशी मागणी भारताच्या केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या परवानगीवर भारत सरकार पुन्हा काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

बीसीसीआयला आयपीएल जर युएईमध्ये खेळवायची असेल तर त्यांच्यासाठी भारत सरकारची परवानगी सर्वात महत्वाची होती. भारत सरकारने काल बीसीसीआयला युएईमध्ये आयपीएल खेळवण्याची परवानगी दिली होती. पण आता आयपीएल रद्द करण्याचीच मागणी भारताच्या केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारत सरकार आपला निर्णय बदलणार का, यावर सर्वांचे लक्ष असेल.

नेमकं घडलंय तरी काय…बीसीसीआय युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करणार आहे. आयपीएलला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण आयपीएलसाठी बीसीसीआयने मुख्य प्रायोजन म्हणून चीनच्या विवो या कंपनीला कायम ठेवले आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तणावाचे संबंध असताना बीसीसीआय विवोचे प्रायोजकत्व कसे घेऊ शकते, हा प्रश्न यापूर्वीही उठला होता. आता भारतातील काही महत्वाच्या व्यक्तींनी आयपीएल रद्द करण्याची मागणी केली आहे.

आयपीएल रद्द करण्याची मागणी कोणाची…यंदाची आयपीएल रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारतातील व्यापारी संघटनेने केली आहे. यावेळी या संघटनेने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आयपीएल रद्द करण्याची मागणी केली आहे.

या पत्रामध्ये संघटनेने लिहिले आहे की, ” बीसीसीआय आयपीएल युएईमध्ये खेळवत आहे. पण या आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व हे चीनच्या विवो कंपनीकडे आहे. भारत आणि चीन यांच्या बॉर्डरवर नेमकी काय परिस्थिती आहे, हे सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे जर आयपीएलमध्ये चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व असेल तर भारतीयांच्या भावना नक्कीच दुखावल्या जातील. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. कारण आपले पंतप्रधान एकिकडे आत्मनिर्भर होण्यावर भर देत आहेत, त्याचवेळी चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व बीसीसीआयने आयपीएलसाठी घेणे कितपत योग्य आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here