नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की, विक्रम हे मोडण्यासाठीच होतात. पण प्रत्येक विक्रमाला हा नियम लागू होत नाही. काही विक्रम असे असतात जे अनेक वर्ष तुटत नाहीत आणि भविष्यात देखील हे विक्रम मोडण्याची शक्यता अशक्य दिसते. क्रिकेटमधील अशाच एका विक्रमाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे हा विक्रम एका भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर आहे.

क्रिकेटच्या इतिहासात सातत्याने सर्वात जास्ट निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम भारताचे माजी गोलंदाज बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. टीम इंडियाचे माजी ऑलराउंडर बापू यांनी कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे ज्याची कोणी कल्पना देखील करणार नाही आणि तो विक्रम मोडण्याचा विचार देखील कोणाच्या मनात येणार नाही.

वर्ल्डकप ६ महिन्यांवर असताना द्रविड यांनी डायरेक्ट पत्ते उघड केले; संघात यांना मिळणार संधी
बापू नाडकर्णी यांनी कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकली आहेत. १९६४ साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा मद्रास (आताचे चेन्नई)येथील नेहरु स्टेडियमवर कसोटी लढत झाली होती. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३२ षटके गोलंदाजी केली होती. त्यातील २७ षटके ही निर्धाव होती आणि फक्त ५ धावा दिल्या होत्या. बापू यांनी सलग २१.५ षटके म्हणजे १३१ चेंडूवर एकही धाव दिली नाही.

कसोटीत झालेल्या या विक्रमाला ५० हून अधिक वर्ष झालीत. या काळात क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. टी-२० आणि टी १० सारखे फॉर्मेट देखील आले. कसोटीत देखील फलंदाज आक्रमक बॅटिंग करतात. ते बाद होतील पण खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळेच बापूंच्या नावावर झालेला विक्रम मोडणे सध्याच्या काळात तरी अशक्य वाटते.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

भारताचे सर्वात कंजूस गोलंदाज

बापू नाडकर्ण हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताचे सर्वात कंजूस गोलंदाज आहेत. त्यांनी १९५५ ते १९६८ या काळात ४१ कसोटी सामने खेळले. या काळात त्यांनी ९ हजार १६५ चेंडू टाकले आणि फक्त २ हजार ५५९ धावा दिल्या. त्यांची इकोनॉमी १.६७ प्रती ओव्हर आहे. कसोटीत कमीत कमी २ हजार चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्यांची इकोनॉमी चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी ८८ फलंदाजांना बाद केले. ४१ कसोटीत २६च्या सरासरीने १ हजार ४१४ धावा केल्या. यात एका शतकाचा समावेश होता. १२२ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. प्रथम श्रेणीत त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या संघाकडून त्यांनी १९१ सामन्यात ५०० विकेट आणि ८ हजार ८८० धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here