चेन्नई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. आपल्या जुन्या फॉर्मात परतलेला किंग कोहली जुन्याच शैलीत आक्रमकपणे खेळताना दिसत आहे. अहमदाबाद कसोटीत शतक (१८६) झळकावल्यानंतर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही जबरदस्त फलंदाजी केली. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, या सामन्यादरम्यान कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस यांच्यात लाईव्ह सामन्यातील एक प्रसंग पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

लाईव्ह सामन्यात भिडले स्टोयनिस आणि कोहली

मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाकडून भारतीय डावातील २१ वे षटक टाकत होता. षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर स्टॉयनिस पुढच्या चेंडूसाठी रनअप वर परतत होता. तर त्याच वेळेला विराट कोहली केएल राहुलसोबत बोलण्यासाठी जात होता. या दरम्यानच विराट कोहलीने मार्कस स्टॉयनिसला त्याच्या खांद्याने मोठा धक्का दिला. धक्का इतका जोरदार होता की स्टोयनिस पूर्णपणे मागच्या मागे तोल गेलेला दिसला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्माने फलंदाजांवर काढली भडास, सुनावले खडे बोल
स्टोयनिसने काय केलं

विराट कोहलीच्या त्या अचानक दिलेल्या धक्क्यानंतर स्टॉयनिसने त्याच्याकडे बघितले सुद्धा नाही आणि सरळ तो आपल्या रनअपच्या दिशेने पुढे जात होता. तर कोहलीने धक्का मारून पुढे गेल्यावर त्याच्याकडे रागात पाहत होता. स्टॉयनिस पुढे गेल्यावर आपले केस सरळ करत हसत होता. त्यामुळे हा नेमका काय प्रकार घडला, ते नीट कोणाच्या लक्षात येईना.

दोघांमध्ये खरंच भांडण झालं होतं का? पण व्हिडीओ पाहून दोघांमध्ये मस्ती सुरु आहे असं नक्कीच म्हणू शकतो. कारण कोहलीने ढकलल्यानंतर स्टॉयनिस हसताना दिसला. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

बुधवारी, २२ मार्चला चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या संघाने २१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने ही वनडे मालिका २-१ अशी जिंकली आणि भारताचा विजय रथ रोखला आहे. टीम इंडियाने गेल्या ४ वर्षांपासून मायदेशात एकही आंतरराष्ट्रीय मालिका गमावलेली नव्हती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here