भोपाळ: अंबाला येथील भगीरथ पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना फुटबॉलवेड्या सरबजोत सिंगने उन्हाळी शिबिरात काही मुलांना एअर गनच्या साह्याने लक्ष्यवेध करताना पाहिले. त्याने काही दिवसातच नेमबाजी करण्याचे ठरवले. याच सरबजोतने बुधवारी भोपाळ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

सरबजोतचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडिल शेतकरी आहेत. मुलाचा नेमबाजीचा महागडा हट्ट पुरवणे अवघड आहे, हे ते जाणून होते. त्यांनी तेच मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण अखेर मुलाच्या हट्टापुढे सरबजोतच्या वडिलांनी हार मानली. कमालीच्या शांतपणे लक्ष्यवेध करणाऱ्या सरबजोतने राज्य, राष्ट्रीय आणि वर्ल्ड कपमध्ये बाजी मारली, त्यावेळी सरबजोतचे वडिल नक्कीच सुखावले असतील.

कैरो वर्ल्ड कप स्पर्धेत पदक थोडक्यात हुकल्यानंतर सरबजोतने सरावात स्वतःला पूर्ण झोकून दिले. त्याने मध्य प्रदेश राज्य नेमबाजी अकादमीच्या रेंजवर ५८५ गुणांसह पात्रता फेरीत अव्वल क्रमांक मिळवला. त्यानंतर मानांकनाच्या फेरीत २५३.२ गुणांसह बाजी मारली. त्याने सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत अझरबैझानच्या रुस्लान लुनेव याला १६-० असे हरवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.

IPLमधील कर्णधारांना मिळणार ‘सुपर पॉवर’; अखेरच्या क्षणी घेता येणार मॅचचा निकाल बदलवणारा निर्णय

त्याने १०.९ गुणांची अचूकता साधत अव्वल क्रमांक मिळवला. या शॉटमधून त्याने कैरो स्पर्धेनंतर केलेली मेहनतच दाखवून दिली. त्याने प्राथमिक फेरीच्या सहा फैरीत ९८, ९७, ९९, ९७, ९७, ९७ अशी कामगिरी केली होती.

सुवर्णपदकाच्या लढतीत माजी जागतिक ज्युनियर विजेता सरबजोत स्वतःशीच स्पर्धा करीत होता. त्यामुळे १०-० आघाडीनंतर त्याने १६-० वर्चस्वाचे लक्ष्य ठेवत ते साध्य केले.

क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडले जातील, पण हा रेकॉर्ड मोडणे अशक्य; भारताच्या गोलंदाजाने…
वरुण तोमरला ब्राँझ

प्राथमिक फेरीत आठवा आलेल्या वरुण तोमरने मानांकन फेरीत कामगिरी उंचावली. त्याने २५०.३ गुणांसह ब्राँझ पदक जिंकले. मानांकन फेरीत पहिल्या फैरीनंतर तो तिसरा होता. दुसऱ्या फैरीनंतर त्याची काहीशी पिछेहाट झाली, पण त्याने चौथ्या आणि पाचव्या फैरीत कामगिरी उंचावत याची भरपाई केली.

आयपीएलमध्ये बॉलबॉय म्हणून मैदानावर आलेल्या अर्जुनसाठी बहिण साराची भावनिक पोस्ट

महिलांकडून निराशा

भारतीय पुरुष नेमबाज पहिल्या दिवशी दोन पदके जिंकत असताना महिला नेमबाजांनी निराशा केली. दिव्या सुब्बुराजूने मनू भाकर अपयशी ठरत असताना अंतिम फेरी गाठल्याचा दिलासा दिला. दिव्याने ५७९ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली, पण मानांकन क्रमवारीत पाचवी आली. केवळ अर्ध्या गुणामुळे ती अव्वल चारमध्ये आली नाही. रिधम सांगवान (५७२ – १३) आणि मनू भाकर (५८८ – १६) पदकापासून खूपच दूर राहिल्या. त्यांच्यापेक्षा जागतिक मानांकन उंचावण्यासाठी सहभागी झालेल्या इशा सिंग (५७६) आणि यशस्वीनी देसवाल (५७४) यांनी जास्त गुण मिळवले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here