मुंबई इंडियन्सची बलस्थान
मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव असे भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. टीम डेव्हिड हा मधल्या फळीतील एक दमदार फलंदाज आहे. लिलावात फ्रँचायझीने कॅमेरून ग्रीनला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हॉल्ड ब्रेविस हे दक्षिण आफ्रिकेचे दोन युवा फलंदाज आहेत. अशा स्थितीत संघाची फलंदाजी बाजू खूपच भक्कम दिसत आहे.
गोलंदाजीत संघाकडे जोफ्रा आर्चरसारखे मोठे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. फिरकीमध्ये, फ्रँचायझीने अनुभवी पियुष चावलाला संघात घेतले आहे. जेसन बेहरेनडॉर्फही मुंबईकडून खेळताना दिसेल.
मुंबई इंडियन्सची कमजोर बाजू
जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचे झाय रिचर्डसन आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. बुमराहच्या अनुपस्थितीत संघाकडे कोणताही अनुभवी देशांतर्गत वेगवान गोलंदाज नाही. फ्रँचायझीने त्याच्या बदलीची घोषणाही अद्याप केलेली नाही. फिरकीतही चावलाशिवाय परदेशी संघांना दडपण आणेल असे दुसरे नाव नाही.
कोण असणार मुंबईचा एक्स फॅक्टर
मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक तरुण चेहरे आहेत, जे आपल्या खेळीने सर्वांना आश्चर्याचे धक्के देऊ शकतात. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते शम्स मुलानी. मुलानी हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे, परंतु अद्याप त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. तो संघासाठी सामना जिंकणारा अष्टपैलू खेळाडू ठरू शकतो. अर्शद खान हा मुंबई संघातील एक असा खेळाडू आहे, ज्याचे नाव फार कमी लोकांना माहीत असेल पण तो गेमचेंजर ठरू शकतो. तो बॉल आणि बॅट दोन्हीने चमत्कार करू शकतो.
आयपीएलमध्ये बॉलबॉय म्हणून मैदानावर आलेल्या अर्जुनसाठी बहिण साराची भावनिक पोस्ट
मुंबई इंडियन्सची पलटन
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन , जेसन बेहरेनडॉर्फ, डने जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल, ऱ्हाय रिचर्डसन, आकाश मधवाल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times