१) कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक विकेट-
महान ऑलराउंडर कपिल देव यांनी १९८३ साली तेव्हाच्या सर्वात धोकादायक संघ असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली होती जी आजवर कोणाला करता आली नाही. कपिल देव यांनी तेव्हा कर्णधार म्हणून एका डावात ९ विकेट घेतल्या होत्या. कर्णधार म्हणून एका डावात इतक्या विकेट घेणारे ते एकमेव गोलंदाज आहेत. त्यांचा हा विक्रम आज देखील कायम आहे.
२) एका मालिकेत सर्वाधिक धावा आणि विकेट
१९७९-८० साली झालेल्या कसोटी मालिकेत कपिल देव यांनी २७८ धावा आणि ३२ विकेट घेतल्या होत्या. एका कसोटीत सर्वाधिक धावा आणि विकेट घेण्याबाबत कपिल देव हे भारतात अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या पुढे आजवर एकाही खेळाडूला जाते आले नाही. या यादीत दुसऱ्या स्थानावर आर अश्विन आहे.
३) सहाव्या क्रमांकावर वर्ल्ड रेकॉर्ड
कपिल देव यांनी १९८३ साली वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना विक्रमी खेळी केली होती. जेव्हा टीम इंडियाची फलंदाजी संपूर्णपणे ढासळली होती तेव्हा कर्णधार कपिल देव यांनी लाज राखली होती. कपिल देव यांनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १७५ धावा केल्या होत्या. त्याच्या या फलंदाजीमुळे भारताने मॅच जिंकली होती. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना आजवर एकाही फलंदाजाला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. हा विक्रम आज देखील कपिल देव यांच्या नावावर आहे.
४) कसोटीत ५ हजार धावा आणि ४०० विकेट
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी करिअरमध्ये ५ हजार हून अधिक धावा आणि ४०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. कपिल यांच्या नावावर कसोटीत ५ हजार २४८ धावा आणि ४३४ विकेट आहेत.
‘सचिन व्हायचे की विनोद कांबळीच्या मार्गावर जायचे
५) एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा आणि विकेट
हरियाणाचा हरिकेन अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात ६०० हून अधिक धावा आणि ७० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि जो आजवर कोणाला मोडता आलेला नाही. देव यांनी १९७९ साली ६१९ धावा आणि ७४ विकेट घेतल्या होत्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times