आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या करोना चाचणीबाबतचा एक खुलासा संघाच्या एका अधिकाऱ्याने केलेला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला भारताच्या सर्व खेळाडूंना करोना चाचणी आवश्यक आहे. या चाचणीत खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर त्याला युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी जाता येणार नाही.

यावर्षी आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे. आयपीएल जर यशस्वी करायची असेल तर युएईमधील करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन बीसीसीआय आणि आयपीएल खेळाडूंना करावे लागणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी धोनीच्या करोना चाचणीबाबत एक खुलासा केला आहे.

यंदाची आयपीएल ही धोनीसाठी सर्वात महत्वाची समजली जात आहे. कारण या आयपीएलवर धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीने फेब्रुवारीमध्येच आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली होती. पण त्यानंतर करोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे धोनीला आपला सराव थांबवावा लागला होता.

चेन्नईच्या संघाने १० ऑगस्टला युएईमधून जाऊन सराव करण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. पण बीसीसीआयने ही परवानगी नाकारली. त्यामुळे आता चेन्नईच्या संघाला २० ऑगस्टला युएईमध्ये जाता येणार आहे. पण त्यापूर्वी धोनी आणि खेळाडूंची करोना चाचणी होणे अत्यावश्यक आहे. करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याशिवाय धोनीसहीत कोणत्याही खेळाडूला आयपीएलसाठी युएईमध्ये जाता येणार नाही.

धोनीसह सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणे अत्यावश्यक आहे. करोना चाचणी झाल्याशिवाय धोनीला युएईमध्ये जाता येणार नाही. याबाबत चेन्नई सुपर किंग्स संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, ” चेन्नईच्या संघाला २० ऑगस्टला युएईमध्ये आयपीएलसाठी पोहोचायचे आहे. त्यासाठी धोनीसहीत चेन्नईच्या संघातील खेळाडूंची करोना चाचणी आम्ही १८-१९ ऑगस्ट या दिवसांमध्ये घेणार आहोत. करोनाची चाचणी केल्यावर अहवाल येण्यासाठी जास्त कालावधी लागत नसल्यामुळे करोनाचा अहवाल आल्यानंतर ४८ तासांमध्ये आम्ही युएईला रवाना होण्यासाठी निघणार आहोत. त्यामुळे सर्व खेळाडूंचे अहवाल आल्यावर आम्ही लगेचच युएईला रवाना होण्याची तयारी करणार आहोत. आम्ही सातत्याने बीसीसीआयच्या संपर्कात आहोत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here