वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार – गावस्कर
गावस्करानी ‘स्टार स्पोर्टस’ला सांगितलं की, विरोधी संघाच्या गोलंदाजीच्या दबावामुळे भारतीय फलंदाजाना एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्ही असे शॉट्स खेळता ज्याची तुम्हाला सवय नसते आणि मग पराभवाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे या समस्येवर काम करणं गरजेच आहे.
गावस्कर पुढे म्हणाले की ‘भारतीय संघ अनेकदा ही चुक करतो की, तो पराभवाला विसरतो, जे संघासाठी चांगली गोष्ट नाही. कारण हे वर्ल्डकपचे वर्ष आहे आणि भारताला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागू शकतो.
पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस
भागीदारीकडे लक्ष द्या
गावस्करांनी सामन्यांबद्दल बोलत असताना भारतीय संघाला सामन्यात भागीदारीवर फोकस कराण्याची सुचना दिली आहे. जेव्हा तुम्ही २७० धावांचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला ९०-१०० च्या भागीदारीची गरज असते. असे झाल नाही कारण विरोधी संघाचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times