मुंबई: आपल्या पहिल्याच आयपीएल टुर्नामेंटमध्ये जेतेपद पटकवणारा संघ म्हणजे गुजरात टायटन्स. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखालील या संघाने आयपीएल २०२२ चे जेतेपद पटकावले. पांड्याने २०२२ चे जेतेपद मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. यंदाही हार्दिक पांड्याकडेच गुजरातच्या संघाची कमान असेल, हे जवळपास निश्चित आहे. पण या दरम्यानचं संघाच्या मॅनेजमेंटला एका दुसऱ्या खेळाडूमध्ये कर्णाधार दिसत आहे. गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी यावर वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते पांड्याचा मित्र आणि सहकारी खेळाडूमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडण्याची क्षमता दिसत आहे, अस ते म्हणाले. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याला क्रिकेटची उत्तम जाण असून भविष्यात तो या फ्रँचायझी संघाचा कर्णधार होऊ शकतो, असा त्यांनी व्यक्त केला. गिल गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतकासह यादरम्यान प्रभावी कामगिरी केली आहे.

श्रेयस अय्यरचा धाडसी निर्णय, पाठीवरील सर्जरीसाठी दिला नकार; सत्य आले समोर
सोलंकी पुढे म्हणाले, ‘शुभमनमध्ये नेतृत्व गुण आहेत आणि तो जबाबदारीही स्वीकारतो. माझ्या मते, तुमच्या नावासमोर कर्णधार लागले असेल तरच तुम्ही तुमची भूमिका निभावता हे महत्त्वाचे नाही. शुभमनने गेल्या वर्षीही त्याच्या वर्तनामुळे आणि खेळाप्रती असलेला दृष्टिकोन यामुळे एका लीडरची भूमिका साकारली होती.’

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

सोलंकी म्हणाले, ‘मला वाटते की शुभमन भविष्यात कर्णधार असेल. होय, परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याच्यात नेतृत्वगुण आहेत, तो खूप परिपक्व आणि खूप प्रतिभाशाली आहे. त्याला क्रिकेटची चांगली समज आहे आणि आम्ही शुभमनसोबत चर्चा सुरू ठेवू आणि जो काही निर्णय घेऊ त्यामध्ये निश्चितपणे त्याचे मत घेऊ.” गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये त्यांचा पहिला सामना ३१ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here