नवी दिल्ली: टीम इंडियाला यंदा दोन आयसीसीचे मोठे सामने खेळायचे आहेत. एक म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि दुसरा भारतात होणार एकदिवसीय विश्वचषक २०२३. आताच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेत भारताची फलंदाजी बाजू पाहता भारताला ती सुधारण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. तर अशातच त्यांचा मधल्या फळीतील दमदार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. आता श्रेयसला या दुखापतीतून बरं होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे. पण श्रेयसने शस्त्रक्रिया करवून घेण्यापासून नकार दिला आहे. वाचा काय आहे कारण. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयसला पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास झाला, त्यामुळे कसोटी सामन्यादरम्यानच तो स्कॅनसाठी रुग्णालयात पोहोचला होता. दुखापतीतून सावरण्यासाठी अय्यरला शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यामुळे तो सुमारे ६ ते ७ महिने संघातून बाहेर राहील. याच ६ ते ७ महिन्यांच्या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे.

पहिल्या वहिल्या WPL मधील दोन फायनलिस्ट आज मिळणार, वाचा कोणत्या संघामध्ये रंगणार एलिमिनेटरची लढत
श्रेयस का देतोय शस्त्रक्रियेसाठी नकार

क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरवर अद्याप शस्त्रक्रिया झालेली नाही. आयपीएलपेक्षा विश्वचषक खेळण्यावर त्याचा अधिक भर आहे. जर श्रेयसवर शस्त्रक्रिया झाली तर तो किमान ६ ते ७ महिने संघाबाहेर असेल ज्यामुळे तो एकदिवसीय विश्वचषकाचा भाग होऊ शकणार नाही. यामुळे अय्यरला अजिबात धोका पत्करायचा नाही. यंदाचा आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताकडे आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ही मोठी आयसीसी स्पर्धा आयोजित केली जाईल. याशिवाय श्रेयस अय्यर आयपीएल खेळणार असल्याची चर्चा आहे, पण या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. अय्यर कदाचित आयपीएलचे सुरूवातीचे सामने खेळताना दिसणार नाही.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

श्रेयस अय्यरचे टीम इंडियाच्या मधल्या फळीतील स्थान संघाच्या फलंदाजी फळीला अधिक मजबूत करतं. त्यामुळे त्याचे संघात असणे खूप महत्त्वाचे ठरते. अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ शतके आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ४६.६ च्या सरासरीने १६३१ धावा केल्या आहेत. याशिवाय श्रेयस अय्यरने कसोटीत ४१.६ च्या सरासरीने ६६६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये या भारतीय खेळाडूच्या बॅटने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here