Maharashtra Kesari Women Final, महाराष्ट्र केसरी महिला: कल्याणची वैष्णवी पाटील vs सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात फायनल – maharashtra kesari women final between vaishnavi patil of kalyan vs pratiksha bagdi of sangli
कल्याण : कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील सांगली येथील होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असून सांगली मधील महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची वैष्णवी दिलीप पाटील यांच्यात आज संध्याकाळी अंतिम होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत कोण विजयी होईल हे पाहण्यासाठी आख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम येथे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.लहानपणा पासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पोचली आहे.वैष्णवी पाटीलचे वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचेही घरामधून पहिल्यापासूनच कुस्तीचा ओढा होता.त्यामुळे वैष्णवीला आवड निर्माण झाली. क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडले जातील, पण हा रेकॉर्ड मोडणे अशक्य; भारताच्या गोलंदाजाने… राज्य,राष्ट्रीय लेव्हल पर्यंत तसंच आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत त्यांनी बाळगलेला स्वप्न मला पूर्ण करायचा असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायचे आहे, असे वैष्णवीने सागितले.