मुंबई: महिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेत काल रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर ७२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत स्थान पक्के केले आता रविवारी ब्रेबर्न स्टेडियमवर जेतेपदासाठी त्यांची लढत दिल्लीविरुद्ध होणार आहे. डी.वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ४ बाद १८२ धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंट ३८ चेंडूत नाबाद ७२ धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर पोरसवदा दिसणाऱ्या इसी वाँगने स्पर्धेत इतिहास घडवला. या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक वाँगने नोंदवली. वाँगच्या घातक गोलंदाजीसमोर यूपी संघाची दाणादाण उडाली. तिने एका पाठोपाठ तिघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

IPLमुळे रोहित शर्माला कशाची भीती वाटते? बोलून दाखवली मनातील सर्वात मोठी शंका आणि चिंता
यूपी वॉरियर्सच्या डावातील १२वे षटक अमेलिया केरने टाकले. या षटकात यूपीच्या फलंदाजांनी १९ धावा वसूल केल्या. त्यानंतर १३व्या षटकात कर्णधार हरमनप्रीत कौरने इसी वाँगच्या हातात चेंडू दिला आणि हाच निर्णय मॅचचा निकाल बदलवणारा ठरला. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर वाँगने किरन नवगिरेला बाद केले. मिट विकेटवर नॅट सिव्हरने तिचा कॅच घेतला. तिसऱ्या चेंडूवर वाँगने सिमरन शेखला बोल्ड केले तर चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनला बोल्ड करत हॅटट्रिक पूर्ण केली.

क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडले जातील, पण हा रेकॉर्ड मोडणे अशक्य; भारताच्या गोलंदाजाने…

‘सचिन व्हायचे की विनोद कांबळीच्या मार्गावर जायचे

इसी वाँगने पहिल्या स्पेलमध्ये शानदार गोलंदाजी केली. तिने यूपीची कर्णधार एलिसा हिलीची विकेट घेतली होती. जगातील आघाडीची फलंदाज असलेल्या हिलीचा कॅच हरमनप्रीत कौरने घेतला. वाँगने ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट घेतल्या. यासह स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप-५ मध्ये तिचा समावेश झाला आहे. वाँगच्या वादळी गोलंदाजीसमोर यूपीचा डाव फक्त ११० धावात संपुष्ठात आला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here