ऑकलँड: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिली लढत आज ऑकलँड येथे सुरू आहे. पहिल्या लढतीत पाहूण्या श्रीलंका संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या गोलंदाजांनी यजमान न्यूझीलंडचा ४९.३ षटकात २७४ धावांवर ऑलआउट केला. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना अशी एक घटना घडली ज्यावर क्रिकेट चाहत्यांचा विश्वास बसला नाही. न्यूझीलंडच्या डावात सलामीचा फलंदाज फिन अ‍ॅलन ९ धावांवर बॅटिंग करत होता. दरम्यान श्रीलंकेचा जलद गोलंदाज कसुन रजिथाने वायूच्या वेगाने एक चेंडू टाकला, हा चेंडू कधी आणि कसा आला हे फिनला कळालेच नाही. चेंडूचा वेग इतका होता की फिनने बॅट मध्य आणण्याच्या आधीच तो ऑफ स्टंपला लागला. पण चेंडू विकेटला लागल्यानंतर देखील फिन बाद झाला नाही. कारण स्टंपवरील बेल्स पडल्या नाहीत. या प्रकारानंतर मैदानावरील सर्व खेळाडू आणि टीव्हीवर पाहणाऱ्या सर्वांना एकच धक्का बसला. गोलंदाज रजिथाला देखील काही वेळ विश्वास बसला नाही.

इसी वाँगने इतिहास घडवला, WPLमध्ये पहिल्या हॅटट्रिकची नोंद; मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक
फिनला मिळालेल्या या जीवनदानाचा त्याने करत फायदा करून घेतला. ४९ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह त्याने ५१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या डावातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. या शिवाय डॅरिल मिचेलने ५८ चेंडूत ४७ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. विकेटकीपर ग्लेन फिलिप्सने ३९ तर स्टार युवा ऑलराउंडर रचिन रविंद्रने ४९ धावा केल्या.

ओपन चॅलेंजच समजा; भारतीय खेळाडूचे हे ५ विक्रम मोडण्याची कोणाची हिम्मत झाली नाही

क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडले जातील, पण हा रेकॉर्ड मोडणे अशक्य; भारताच्या गोलंदाजाने…
लंकेची दाणादाण

विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची दाणादाण उडाली. त्यांचा डाव फक्त ७६ धावांवर संपुष्ठात आला आणि न्यूझीलंडने पहिली वनडे १९८ धावांनी जिंकली. न्यूझीलंडकडून हेन्ररी शिंपलेने ७ षटकात ३१ धावा देत ५ विकेट घेतल्या. दोन्ही संघात याआधी झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने १-० असा विजय मिळवला होता. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका देखील होणार आहे.

आयपीएलमध्ये बॉलबॉय म्हणून मैदानावर आलेल्या अर्जुनसाठी बहिण साराची भावनिक पोस्ट

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here