एकीकडे रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंना बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बढती मिळाली, तर दुसरीकडे केएल राहुलला मात्र तोटा सहन करावा लागला. राहुलला आता A मधून B श्रेणीत गेला आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरचेही नाव खाली जाणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. शार्दुल याआधी B श्रेणीत होता, त्याला आता C श्रेणीत टाकण्यात आले आहे.
यासोबतच बीसीसीआयने काही वरिष्ठ खेळाडूंना आपल्या कराराचा भाग बनवले नाही. या यादीत अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे. तर संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, इशान किशन आणि केएस भरत यांचा C श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वेगवेगळी वार्षिक रक्कम दिली जाते. A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक फी मिळते. या श्रेणीत बीसीसीआयकडून खेळाडूंना ७ कोटी रुपये दिले जातात. A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी तर B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी मिळतात. तर C श्रेणीतील खेळाडूला १ कोटी दिले जातात.
पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस
A+ श्रेणीतील खेळाडू – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
A श्रेणीतील खेळाडू – हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल
B श्रेणीतील खेळाडू – लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल
C श्रेणीतील खेळाडू – शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times