चेन्नई: बहुप्रतीक्षित असा आयपीएलचा (Indian Premiere League 2023) १६ वा सीझन सुरू होण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्व संघांचे खेळाडू त्यांच्या संघात सामील होत असून खेळाडूंनी सामन्यासाठी सराव सुरू केला आहे. या स्पर्धेचा पहिला सामना ३१ मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात खेळवला जाईल. पण या सामन्यापूर्वी CSK चा सुपरस्टार खेळाडू रवींद्र जडेजा शानदार स्टाईलमध्ये दिसला आहे. त्याचा हा भन्नाट व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएलसाठी चेपॉक स्टेडियममध्ये सराव केल्यानंतर परतताना दिसत आहे. दरम्यान, सराव करून परत येताच त्याने प्रथम चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केले आणि नंतर प्रसिद्ध पुष्पा चित्रपटाच्या शैलीत चाहत्यांकडे बघत ऍक्शन केली. यानंतर चाहते जडेजाच्या नावाचा एकच जल्लोष करू लागले करू लागले.
साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट रिलीज होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्याची क्रेझ कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने याआधी त्याच्या सिग्नेचर पोझवर एक व्हिडिओ बनवला होता, तर आता भारताचा डॅशिंग अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील चेन्नई सुपर किंग्जच्या सराव दरम्यान पुष्पाची ‘झुकेगा नही साला’ या डायलॉगवली पोझ करून दाखवून दिली.
जगभरात उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जाणारा जडेजा त्याच्या कमाल गोलंदाजीसोबतच चांगल्या फलंदाजीसाठीही ओळखला जातो. टीम इंडिया असो किंवा आयपीएलमधील सीएसके संघ, या खेळाडूने अनेक प्रसंगी चांगली कामगिरी करून सामने जिंकले आहेत. आता IPL २०२३ मध्ये चेन्नईसाठी जडेजा कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट
चेन्नई सुपर किंग्ज संघ:
एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चहर, मुकेश पट्टेरा, पट्टिका सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा, सिसांडा मगला
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times