सध्याच्या घडीला देशामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींनी निवृत्त व्हावे, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे एका व्यक्तींनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘नरेंद्र मोदींचं वय ६९ आहे, तुम्ही त्यांना निवृत्त व्हायला सांगणार का’, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

बऱ्याच क्षेत्रांमध्ये आता ६० वर्षांनंतर निवृत्ती घ्यावी, असे म्हटले जात आहे. पण राजकारण या गोष्टींला पूर्वीपासून अपवाद असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राजकारण्यांचे कितीही वय झाले तरी ते निवृत्त होताना दिसत नाहीत. यावरच एका व्यक्तीने बोट दाखवल्याचे पाहायला मिळत आहे.

बीसीसीआयने एक नवा नियम काढला आहे. त्यानुसार ६० वर्षांवरील व्यक्तींनी मैदानात उतरू नये किंवा प्रशिक्षकपद भूषवू नये, असे म्हटले गेले आहे. ६० वर्षांवरूल व्यक्तींनी सराव सत्रादरम्यान उपस्थित राहू नये, असा बीसीसीआयने नवा नियम केला आहे. त्यानुसार ६० वर्षांपेक्षा जास्त असलेले माजी क्रिकेटपटू हे प्रशिक्षण करू शकत नाहीत. पण या गोष्टीला भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी विरोध केला आहे. करोना व्हायरसला ५९ आणि ६० या वर्षांतला फरक कळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी ६९ वर्ष असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्याकडेही बोट दाखवले आहे.

अरुण लाल यांनी बीसीसीआयला नवा नियम पाळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला अरुण लाल हे बंगालच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांचे वय ६५ वर्षे आहेत. त्यानुसार त्यांना आता बंगालचे प्रशिक्षकपद भूषवता येणार नाही. याबाबत अरुण लाल म्हणाले की,” मी बंगालचा प्रशिक्षक आहे किंवा नाही हा मुद्दा गौण आहे. कारण माझे वय ६० च्या पुढे असले तरी मी स्वत:ला घरात कोंडून घेऊ शकत नाही.”

अरुण लाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाखलाही यावेळी दिला आहे. ते म्हणाले की, ” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय ६९ वर्षे आहे आणि ते देशाचे पंतप्रधान पद भूषवत आहेत, देश चालवत आहेत. त्यांचे वय ६० वर्षांच्या पुढे आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाही निवृत्ती घेण्यास सांगणार का? माझे वय ६५ वर्षे आहे त्यामुळे मी स्वत:ला घरात कोंडून घेणार नाही. करोना व्हायरसमुळे काजही नवीन नियम बनवले आहेत आणि ते योग्यच आहेत. त्यांचे पालन करायलाच हवे. पण बीसीसीआयने जो ६० वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी नियम बनवला आहे, तो मला पटलेला नाही आणि मी त्याचे पालन करणार नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here