मुंबई: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाकडून त्यांचं चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यंदा सर्व सामने खेळणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सचा प्रवास फारच अनपेक्षित असा होता. १४ सामन्यांमध्ये १० पराभवांसह शेवटच्या स्थानावर मुंबई होती आणि आता रोहित सर्व सामने न खेळल्याने त्याच्या चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.इंडियन प्रीमियर लीगचा १६वा सिझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २ एप्रिल रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. रोहित संघासाठी साखळी फेरीतील सर्व १४ सामने खेळताना दिसणार नाही. मुंबईला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित यंदाच्या मोसमात कधी सामना खेळायचा आणि कधी विश्रांती घ्यायची हे स्वतःच निवडणार आहे. त्याच्या जागी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार आहे.

IPL 2023: गोविंदाचा जावई शाहरुखच्या मदतीला, बदलणार किंग खानच्या KKR संघाचं नशीब
रोहित सर्व सामने खेळणार नाही

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचा संघ भारतीय कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी हे करत आहे. आयपीएलनंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना खेळायचा आहे, तर वर्ल्ड कपही ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत रोहितला अतिरिक्त थकव्यापासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. बातमीनुसार, रोहित त्याच्या सोयीनुसार कोणत्या सामन्यांमध्ये खेळायचा आणि कोणत्या नाही हे ठरवेल. जेव्हा तो संघाबाहेर असेल तेव्हा सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळेल. सूर्या हा कसोटी संघाचा नियमित भाग नाही आणि त्याच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

काय म्हणाला कर्णधार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्माने वर्कलोड मॅनेजमेंटबाबत विधान केले होते की, आयपीएलमधील खेळाडूंबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त फ्रँचायझींना आहे. खेळाडूंवरील कामाचा ताण कसा सांभाळायचा हे ते ठरवतील. यासोबतच तो म्हणाला की, प्रत्येक खेळाडूला काय हवंय यावरही ते अवलंबून असतं. जर त्याला वाटत असेल की त्याच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे, तर तो एक किंवा दोन सामन्यांसाठी विश्रांती घेऊ शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here