चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा खेळाडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फिटनेसवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण धोनीला सुद्धा दुखापत झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
सराव सत्रादरम्यान धोनी डाव्या पायाने लंगडताना दिसला. ४१ वर्षीय धोनीला धावा काढण्यात अडचण येत होती. धोनीच्या दुखापतीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी, CSK साठी ही चिंतेची बाब आहे कारण चेन्नई सुपर किंग्ज ३१ मार्च रोजी त्यांच्या पहिला सामना खेळणआर आहेत.
चेन्नईच्या घरच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी एमएस धोनीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सीएसकेने त्यांच्या चाहत्यांना संघाचा सराव पाहण्यासाठी आमंत्रित केले होते, त्यानंतर अनेकजण जिममध्ये धोनीची ट्रेनिंग पाहण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये गेले. या सराव सत्रात धोनीने काही मोठे फटकेही खेळले, जे पाहून चाहतेही एकच जल्लोष करत होते.
स्पोर्टस्टारच्या म्हणण्यानुसार, धोनी सुरुवातीला नेटवर येण्यास संकोच करत होता आणि डावा पायात नीकॅप घातली होती. त्यानंतर धोनीने मैदानात पाऊल ठेवताच एकच जल्लोष पाह्यला मिळाला. यानंतर तो जमावाच्या आवाजाने नेटमध्ये सरावासाठी गेला. चेन्नईत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीची ही पहिलीच मैदानावर हजेरी होती.
माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली
धोनी जेव्हा नेटमध्ये सावरून सांभाळून धावा घेताना दिसला तेव्हा मात्र सीएसकेची चिंता वाढली. विकेट्सच्या दरम्यान वेगवान धावपटू मानल्या जाणार्या धोनीने पायावर जास्त दबाव न आणता सावध धाव घेतली. त्याला त्याच्या गुडघ्यात दुख जाणवली आणि काहीवेळा तो मध्येच थांबला आणि एक धाव पूर्ण केली. सीएसकेच्या संघासाठी ही बातमी नक्कीच टेन्शन वाढवणारी आहे. कारण येत्या २ दिवसात त्यांना आयपीएलमधील त्यांचा पहिला सामना खेळायचा आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
You there, this is really good post here. Thanks for taking the time to post such valuable information.
How to Register in Online Sabong