नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीना जहाँ सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. हसीनाच्या अनेक पोस्ट वादग्रस्त ठरतात आणि युझर तिला ट्रोल देखील करत असतात. आता हसीनाला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. पण यावेळी कारण मात्र विचित्र आहे.

वाचा-
गेल्या काही वर्षापासून हसीना आणि यांच्यात वाद सुरू आहेत. हे दोघे एकमेकांपासून वेगवेगळे राहतात. काही दिवसांपूर्वी हसीनाने ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यावरून पोस्ट केली होती तेव्हा बऱ्याच युझर्सनी तिचे कौतुक केले होते तर काहींनी तिला धमकी दिली होती.

वाचा-
सोशल मीडियावर किती ट्रोल करण्यात आले तरी हसीना तिला हवी ती पोस्ट शेअर करत असते. तसेच ट्रोलरना सुनावण्याची संधी देखील ती सोडत नाही. हसीनाने रक्षाबंधना दिवशी एक व्हिडिओ आणि फोटो इस्टाग्रामवर पोस्ट शेअर केला होता. हसीनाने मुलगी आयरा जहाँचा व्हिडिओ शेअर केला. आयरा तिच्या भावाला राखी बांधत असलेला ह व्हिडिओ आहे. यात बॅकग्राउंडला रक्षाबंधना संदर्भातील गाण सुरू आहे. पण हसीना आणि मोहम्मद शमीच्या मुलीने रक्षाबंधन साजरी करणे काही युझर्सना आवडले नाही. त्यांनी यावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

काही युझर्सनी हसीनाला वेडी म्हटले तर काहींनी मुस्लीम असून रक्षाबंधन कशी काय साजरी करू शकतेस असा सवला केला. अर्थात हसीनाच्या या व्हिडिओवर अनेकांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे. काही जण धर्माच्या पुढे माणुसकी विसरत चालेल आहेत.

वाचा-
हसीनाने दुसऱ्या एका पोस्टमध्ये फोटो शेअर केला असून त्यात बहीण भावाच्या चेहऱ्यावर मास्क लावताना दिसत आहे. या पोस्टमधून हसीनाने करोना व्हायरस बाबत काळजी घेण्याचे आवाहन केलय.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here