मुंबई: टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीशी झुंजत आहे. श्रेयसदेखील सध्या आयपीएलमधून बाहेर आहे, त्याच्या जागी नितीश राणाला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. श्रेयसने बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) येथे अहवाल दिला आहे. त्याच्या पाठीची दुखापत पाहता त्याला पाठीची शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने दिला होता. पण याबाबत श्रेयसने आता मोठा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर पाठदुखीच्या त्रासामुळे अनेकदा त्रस्त दिसला आहे. यामुळे अनेकवेळा तो संघात स्थान मिळवू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात अय्यर या समस्येमुळे फलंदाजीसाठी मैदानावर उतरू शकला नव्हता.

MIच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी! कर्णधार रोहित शर्मा IPL २०२३चे सर्व सामने खेळणार नाही
श्रेयस अय्यरने त्याच्या पाठीच्या समस्येवर शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे ही श्रेयसच्या या निर्णयाबद्दल बातमी समोर आली होती. आता उपचारासाठी ते वेळोवेळी एनसीएला भेट देत आहेत. क्रिकबझच्या बातमीनुसार, तो गुरुवारी एक इंजेक्शन घेणार आहे. त्यावरून त्याचा फिटनेस लक्षात घेऊन एनसीएमध्ये त्याच्या राहण्याचा निर्णय घेतला जाईल.

श्रेयस अय्यरने म्हणून दिला नकार

श्रेयस अय्यरला ७ जूनपासून लंडनमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात निवडीसाठी उपलब्ध व्हायचे आहे. हे लक्षात घेऊन त्याने शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले – त्याने तज्ञ आणि NCA अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. प्रत्येकजण सहमत आहे की ऑपरेशन टाळले जाऊ शकते. तो तज्ञांच्या सल्ल्याचे पालन करेल.

झाडू मारली, रिक्षा चालवली; हातात बॅट घेतली अन् गोलंदाजांची झोप उडवली

काय म्हणाले होते केकेआरचे प्रशिक्षक

दुसरीकडे, त्याचा आयपीएल संघ KKR त्याला लीगच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांच्यासोबत उपलब्ध असेल अशी अपेक्षा करेल. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी मंगळवारी सांगितले – श्रेयसच्या अनुपस्थितीमुळे संघात फरक पडेल कारण तो महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला आशा आहे की श्रेयस लवकरच संघात परतेल. केकेआर १ एप्रिलला पंजाब किंग्जविरूध्द आपला पहिला सामना खेळत आयपीएलमधील आपली चढाओढ सुरू करणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here