मुंबई: मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यन्त ५ वेळा जेतेपद जिंकण्याचा इतिहास आयपीएलमध्ये घडवला आहे. गेल्या सिझनमध्ये मुंबईची कामगिरी खराब असली तरीही यावेळी संघ पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणार नाही. मुंबई इंडियन्सची कमान स्टार फलंदाज रोहित शर्माच्या हातात असेल आणि यावेळी संघाला चमकदार कामगिरी करायची आहे (Mumbai Indians Schedule IPL 2023) आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश करायचा आहे. पण या सगळ्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या वेळापत्रकाशी संबंधित प्रत्येक तपशील जाणून घेऊया.विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. अशा परिस्थितीत यावेळीही मुंबईच्या चाहत्यांना संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल.

IPL वर संकटाचे ढग, करोनाच्या वाढत्या प्रभावावर काय म्हणाले BCCI अधिकारी
यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स नियमित कर्णधार हा रोहित शर्माचं असेल. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार देखील आहे. त्यामुळे आयपीएलनंतर लगेचच भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाइरुद्ध खेळायचा आहे. त्याचसोबत वनडे विश्वचषकही यंदा भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करता रोहित शर्मा यंदा आयपीएलमध्ये सर्व सामने खेळताना दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत भारताचा ३६० डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.

रोहित शर्मा नाही तर कोण? IPL 2023 आधी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय
मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक वेळ ठिकाण
MI vs RCB २ एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता बँगलोर
MI vs CSK ८ एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई
MI vs DC ११ एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता दिल्ली
MI vs KKR १६ एप्रिल २०२३ दुपारी ३:३० वाजता मुंबई
MI vs SRH १८ एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता हैदराबाद
MI vs PBKS २२ एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई
MI vs GT २५ एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबाद
MI vs RR ३० एप्रिल २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई
MI vs PBKS ३ मे २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता मोहाली
MI vs CSK ६ मे २०२३ दुपारी ३:३० वाजता चेन्नई
MI vs RCB ९ मे २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई
MI vs GT १२ मे २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई
MI vs LSG १६ मे २०२३ संध्याकाळी ७:३० वाजता लखनऊ
MI vs SRH २१ मे २०२३ दुपारी ३:३० वाजता मुंबई

मुंबई इंडियन्स कोचिंग स्टाफमार्क बाउचर (मुख्य प्रशिक्षक)
किरॉन पोलार्ड (फलंदाजी प्रशिक्षक)
शेन बाँड (गोलंदाजी प्रशिक्षक)
जेम्स पॅमेंट (फिल्डिंग प्रशिक्षक)

आयपीएलमध्ये बॉलबॉय म्हणून मैदानावर आलेल्या अर्जुनसाठी बहिण साराची भावनिक पोस्ट

मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२३ (Mumbai Indians Squad 2023)

रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ , आकाश मधवाल, कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, ड्वेन जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here