नवी दिल्ली: इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएलच्या १६व्या हंगामाला उद्या म्हणजे ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग अशी आयपीएलची ओळख आहे. आयपीएलमध्ये जितके मनोरंजन होते तितके अन्य कोणत्याही लीगमध्ये होत नाही. या लीगमध्ये फक्त क्रिकेटमधील अॅक्शन नाही तर डान्स आणि म्युझीक देखील पहायला मिळते. प्रत्येक चौकार आणि षटकारावर चीयरलीडर्स डान्स करतात, यामुळे लीगला ग्लॅमरचा तडका देखील मिळतो. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या चीअर लीडर्स कोठून येतात? त्यांचा पगार किती असतो? एका हंगामात त्यांची किती कमाई होते? एका मॅचसाठी किती पैसे मिळतात या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

IPLमधील कर्णधारांना मिळणार ‘सुपर पॉवर’; अखेरच्या क्षणी घेता येणार मॅचचा निकाल बदलवणारा निर्णय
आयपीएलमध्ये आज महिला चीअर लीडर्स दिसत असल्या तरी सुरुवातीला हे काम पुरुष करायचे. १९४० नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा पुरुषांना युद्धासाठी जावे लागले तेव्हा नाईलाजाने महिलांना हे काम करावा लागले. साधारणपणे आपला असा समज असतो की भारतात येणाऱ्या या महिला रशियाच्या असतात पण प्रत्यक्षात असे नाही. या सर्व चीअर लीडर्स युरोपमधील छोट्या मोठ्या शहरातील असतात आणि एजेंसीच्या माध्यमातून त्या आयपीएलमध्ये येतात.

लीगमध्ये दिसणाऱ्या चीअर लीडर्सना पॅकेज दिले जाते. त्यानुसार त्या काम करतात. जास्ती जास्त त्यांना २० हजार डॉलरचे पॅकेज दिले जाते. भारतीय चलानात ही रक्कम १७ लाख रुपयांपर्यंत असते.

IPLमुळे रोहित शर्माला कशाची भीती वाटते? बोलून दाखवली मनातील सर्वात मोठी शंका आणि चिंता
पगार नव्हे तर खरी कमाई अशी होते

पॅकेज वगळता चीअर लीडर्सना पगारासोबत पार्टी परफॉर्मन्स बोनस, एलिमिनेटर बोनस स्वतंत्रपणे दिला जातो. चीअर लीडर्सच्या संघासाठी काम करते तो संघ फायनलपर्यंत पोहोचला तर त्यांना वेगळा बोनस दिला जातो. मॅच झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी होणाऱ्या पार्टीमध्ये गेल्यास त्यांना अधिक कमाई करता येते. चीअर लीडर्सचे असे म्हणणे आहे की, त्या जितके कष्ट करतात त्या तुलनेत त्यांना पगार दिला जात नाही. पगाराशिवाय त्यांनना प्रत्येक मॅचचे तिकीट फ्री मध्ये मिळते. जेवण, रहाणे आणि स्टेडियममध्ये फ्री पार्किंग दिले जाते. युरोपियन देशातील चीअर लीडर्सना भारतासारख्या देशात अधिक पैसे मिळतात. अर्थात त्यामध्ये देखील वय, अनुभव, सुंदर दिसणे आणि फिगर या गोष्टीनुसार पैसे कमी जास्त होतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here