नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल आजपासूनच म्हणजेच ३१ मार्चपासून सुरू होत आहे. या लीगमध्ये पुन्हा एकदा रोमांच आणि चुरशीच्या लढती पाह्यला मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुन्हा एकदा ‘आयपीएल फॅन पार्क’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे आयपीएल फॅन पार्क नेमके काय आहे आणि त्याचा आनंद तुम्ही कुठे अनुभवू शकतो. पाहूया सविस्तरआयपीएल फॅन पार्क २०१५ मध्ये सुरू झाले, ते २०१९ पर्यंत कायम सुरू होते. त्यानंतर मात्र कोविडचे आव्हान पुढे ठाकले, त्यामुळे हे फॅन पार्क बंद करण्यात आले. आता ते आयपीएल २०२३ मध्ये परतणार आहे.
GT vs CSK:अचानक झालेल्या पावसाने दोन्ही संघांचे सराव रद्द, पहिला सामना पावसाला देणार? वाचा अपडेट
४५ शहरांमध्ये फॅन पार्क तयार केले जाणार

आयपीएल फॅन पार्क या सिझनमध्ये ४५ शहरांमध्ये असणार आहेत. यामध्ये सुरत, मदुराई, कोटा, हुबळी, डेहराडून या शहरांची नावे समाविष्ट आहेत. हे फॅन पार्क २० राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये असतील. क्रिकेट चाहत्यांना एक रोमांचक आणि मनोरंजक अनुभव देण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये हे बनवले गेले आहेत. स्पर्धेदरम्यान दर आठवड्याच्या शेवटी पाच फॅन पार्क असतील.
मदुराईला सीझनचा पहिला फॅन पार्क असेल. चाहत्यांना २८ मे रोजी जम्मू, जमशेदपूर, पलक्कड, जोरहाट आणि भोपाळ येथील पाच फॅन पार्कवर IPL 2023 चा अंतिम सामना पाहण्याची संधी मिळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरुवात होईल.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

आयपीएल फॅन पार्क म्हणजे काय?

आयपीएल फ्रँचायझी नसलेल्या राज्यांमध्ये बीसीसीआय चाहत्यांना विनामूल्य सामने पाहण्यासाठी फॅन पार्क तयार करते. या दरम्यान, मोठ्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर थेट सामना खेळला जातो. जिथे बसण्याची व्यवस्था असते. यासोबतच काही उपक्रमही ठेवले जातात. चाहत्यांना आयपीएलशी अधिक बांधून ठेवण्यासाठी आणि स्टेडियमसारखा आनंद देणे हा यामागचा उद्देश आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here