चीनच्या विवो कंपनीने आता बीसीसीआयला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या वर्षी चीनची विवो ही कंपनी आता आयपीएलला प्रायोजकत्व देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता आयपीएल तोंडावर आलेली असताना नवीन प्रायोजक आणायचा तरी कुठून, हा मोठा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. त्यामुळेच आता आयपीएलचे भवितव्य अधांतरी असल्याचे म्हटले जात आहे. कारण आयपीएल सुरु व्हायला काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे एवढ्या कमी वेळात आयपीएलसाठी प्रायोजक कसा शोधायचा, हा मोठा प्रश्न बीसीसीआयपुढे पडलेला आहे.

चीनची विवो आणि आयपीएल यांच्यामध्ये २१९९ कोटी रुपयांचा पाच वर्षांसाठी करार झाला होता. त्यानुसार विवो दरवर्षी आयपीएलला ४४० कोटी रुपये देणार होती. हा करार २०१७मध्ये सुरु झाला होता. त्यामुळे आता या आयपीएलसाठी विवो कंपनी ४४०० कोटी आयपीएलला देणार होती. पण आता आयपीएल तोंडवर आल्यावर विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे म्हटल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे.

यापूर्वी २०१६मध्ये पेप्सिको या सॉफ्ट ड्रिंक्स कंपनीचे प्रायोजकत्व आयपीएलला होते. ही कंपनी बीसीसीआयला दरवर्षी ३९६ कोटी रुपये द्यायची. पण या कंपनीचा करार २०१६ साली संपला. त्यानंतर विवोने बाजी मारत सर्वात जास्त रक्कम आयपीएलला देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार हा करार सुरु होता. पण आता यावर्षी हा करार मोडीत निघाल्याचे समजत आहे.

गेल्या ४८ तासांमध्ये चीनच्या विवो कंपनीबरोबर आयपीएललाही ट्रोल केले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गोष्ट कोणत्याही ब्रँडसाठी चांगली नाही. त्यामुळे आता विवो या कंपनीने आयपीएलबरोबरचा करार रद्द करण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. जर विवोने आता लगेच जर आपला करार रद्द केला तर बीसीसीआयचे प्रचंड नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

बीसीसीआय युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करणार आहे. आयपीएलला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण आयपीएलसाठी बीसीसीआयने मुख्य प्रायोजन म्हणून चीनच्या विवो या कंपनीला कायम ठेवले आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तणावाचे संबंध असताना बीसीसीआय विवोचे प्रायोजकत्व कसे घेऊ शकते, हा प्रश्न यापूर्वीही उठला होता. आता भारतातील काही महत्वाच्या व्यक्तींनी आयपीएल रद्द करण्याची मागणी केली आहे.

यंदाची आयपीएल रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारतातील व्यापारी संघटनेने केली आहे. यावेळी या संघटनेने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आयपीएल रद्द करण्याची मागणी केली आहे.

या पत्रामध्ये संघटनेने लिहिले आहे की, ” बीसीसीआय आयपीएल युएईमध्ये खेळवत आहे. पण या आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व हे चीनच्या विवो कंपनीकडे आहे. भारत आणि चीन यांच्या बॉर्डरवर नेमकी काय परिस्थिती आहे, हे सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे जर आयपीएलमध्ये चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व असेल तर भारतीयांच्या भावना नक्कीच दुखावल्या जातील. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. कारण आपले पंतप्रधान एकिकडे आत्मनिर्भर होण्यावर भर देत आहेत, त्याचवेळी चीनच्या कंपनीचे प्रायोजकत्व बीसीसीआयने आयपीएलसाठी घेणे कितपत योग्य आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  3. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here