अहमदाबाद: आयपीएल २०२३ची पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरूवात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी केली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने चेन्नईला पहिला धक्का दिला. गुजरातकडून तिसऱ्या ओव्हरमध्ये शमीने डेव्हॉन कॉन्वेची बोल्ड घेतली. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉन्वे बोल्ड झाला. शमीचा चेंडू इतका वेगवान होता की पीचवर पडला आणि थेट स्टंपचा वेध घेतला. डेव्हॉन कॉन्वेला चेंडू समझण्याआधीच त्याची विकेट पडली होती. कॉन्वेला ६ चेंडूत फक्त १ धावा करता आली. कॉन्वेच्या या विकेटसह मोहम्मद शमीने आयपीएलमधील १०० विकेटचा टप्पा पार केला. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये २ विकेट गमावत ५१ धावा केल्या.

IPLमधील महाविक्रम या वर्षी तरी मोडले जातील का? यादीत दोघा भारतीय खेळाडूंचा समावेश
काय झालं पॉवर प्लेमध्ये

हंगामातील पहिल्या मॅचच्या निकालाचा आणि विजेतेपदाचे काय कनेक्शन? जो ओपनिंग मॅच जिंकतो त्याचं…


– ऋतुराज गायकवाडने चेन्नईला धमाकेदार सुरुवात करुन दिली
– शमीने कॉन्वेला बाद करत आयपीएलमधील १०० विकेट पूर्ण केल्या
– जोशुआ लिटलने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये १५ धावा दिल्या
– मोईन अलीकडून शमीची धुलाई, एका ओव्हरमध्ये १७ धावा केल्या
– राशिद खानने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये मोईन अली सारख्या धोकादायक खेळाडूची विकेट घेतली.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

पहिल्या सामन्याआधी चेन्नई संघाला टेन्शन होते ते कर्णधार महेंद्र सिंह धोनी खेळणार की नाही याचे, मात्र धोनी टॉससाठी आला आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. धोनीने संघात ऋतुराज गायकवाड आणि राज्यवर्धन हंगरगेकर या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले. राज्यवर्धन हा तुळजापूरचा आहे तर ऋतुराज पुण्याचा आहे. वयाच्या २१व्या वर्षी चेन्नईकडून राज्यवर्धनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. चेन्नईकडून पदार्पण करणारा तो चौथ्या क्रमांकाचा युवा खेळाडू आहे.

चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघात गेल्या हंगामात दोन लढती झाल्या होत्या. या दोन्ही लढतीत चेन्नईचा पराभव झाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here