अहमदाबाद: आयपीएलच्या हा नवा सिझन अधिक रोमनाचाक आहे. यंदाच्या आयपीएलसाठीच्या नव्या नियमांमुळे ही रंगत अधिक पाहायला मीळत आहे. आयपीएल २०२३ मध्येही मोठा बदल पाहायला मिळाला. जो इम्पॅक्ट प्लेअर खेळाडूचा आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक संघ या वर्षी इम्पॅक्ट प्लेअरच्या अंतर्गत सामन्यादरम्यान खेळणाऱ्या ११ खेळाडूंपैकी एका खेळाडूच्या जागी बाहेर बसलेला खेळाडू सामन्यात घेऊ शकतो. पण हा नियम आता पहिल्याच सामन्यात संघावर उलटलेला दिसत आहे. आयपीएल २०२३चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेअर तुषार देशपांडेच्या रूपाने चेन्नईने वापरला. विशेष म्हणजे तुषारने आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. चेन्नईच्या पराभवाचे कारण ठरल्याचेही त्याला म्हटले जात आहे.

चेन्नईच्या थालाची सगळीकडे क्रेझ! भारताचा सुपरस्टार गायक अरिजीत सिंहने थेट धरले धोनीचे पाय
माहीला इम्पॅक्ट प्लेअर पडला भारी

गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात जेव्हा चेन्नई सुपर किंग्स गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा त्यांनी फलंदाज अंबाती रायडूच्या जागी गोलंदाज तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेतले. मात्र, ही चाल महेंद्रसिंग धोनीवरच उलटली. तुषारला गुजरातच्या फलंदाजांनी चांगलाच धुतला. देशपांडेने ३.२ षटकांत १५.३० च्या खराब इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत ५१ धावा दिल्या आणि फक्त १ विकेट घेतली.

चेन्नईकडून शेवटचे षटक तुषार देशपांडेला टाकण्यासाठी दिले होते. पण त्याने ही संधी देखील वाया घालवली. गुजरातला ६ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. पण तुषारच्या गोलंदाजीपुढे गुजरातने २ चेंडूंतच सामना आटोपला. शेवटच्या षटकातील पहिलाच चेंडू वाईड टाकला आणि पुढच्या दोन्ही चेंडूवर तेवतियाने अनुक्रमे १ षटकार आणि चौकार लगावत संघाला सहज विजय मिळवून दिला.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

यासह सीएसकेने पहिला सामना ५ विकेटने गमावला. चेन्नईच्या या पराभवात तुषार देशपांडेच्या खराब कामगिरीचा मोठा हात होता. अशा परिस्थितीत इम्पॅक्ट प्लेअर खेळवणे चेन्नईला महागात पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याशिवाय गुजरात टायटन्सने जखमी केन विल्यमसनच्या जागी साई सुदर्शनचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात समावेश केला. चेन्नईविरुद्ध साईने ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here