अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या ऋतुराजने रेकॉर्डब्रेक खेळी केली. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. चेन्नईसाठी सलामीला आलेल्या या वादळी फलंदाजाच्या जोरावर संघाने धावांचा डोंगर उभारला. उजव्या हाताच्या फलंदाजाने ५० चेंडूंत ९२ धावांच्या धडाकेबाज खेळीत ४ चौकार आणि ९ षटकार ठोकले. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांवर तो चांगलाच बरसला. गुजरातचा प्रत्येक गोलंदाज त्याच्यापुढे गुडघे टेकताना दिसत होता. मैदानाचा असा एकही कोपरा नव्हता जिथे गायकवाडने चौकार मारला नाही. संपूर्ण सामना तो मैदानावर टिकून राहणार होताच कि १८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अल्झारी जोसेफने त्याला झेलबाद केले. षटकार लागवलेला शॉट थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात दिला. ऋतुराजने तर पहिल्याच सामन्यात आपल्या नावे यंदाच्या आयपीएलमधील विक्रम नोंदवले. पण त्याचे शतक हुकले ही खंत सर्वांनाचं आहे.

इम्पॅक्ट प्लेयरयला खेळवणं चेन्नईला पडलं महागात, ठरला संघाच्या पहिल्याच पराभवाचे मोठं कारण
IPL 2023 मधील पहिले अर्धशतक – ऋतुराज गायकवाड
IPL 2023 मधील पहिला षटकार – ऋतुराज गायकवाड
IPL 2023 मधील पहिला चौकार – ऋतुराज गायकवाड

ऋतुराज आऊट नव्हताच?

गुजरातविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजची ताकद, शैली सर्व काही दिसून आले. जाणकार याला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हणत आहेत. त्याने शतक केले असते तर अजून प्रभावी ठरला असता, पण उंच फुल टॉसने त्याला शतकापासून रोखले. १७ षटकांत चेन्नईची धावसंख्या ४ बाद १५१ होती. गायकवाडने १८ व्या षटकात बॅट बदलली आणि विरोधी कर्णधार हार्दिक पंड्याने गोलंदाजही बदलला. डेथ ओव्हरसाठी अल्झारी जोसेफकडे चेंडू सोपवला.

डेथ ओव्हर्समध्ये अल्झारी जोसेफला फटकेबाजी करणे कठीण आहे. पहिला चेंडू मिडल स्टंपवर एक फूलटॉस होता, जो गायकवाडने हवेत खेळला. लाँग ऑनवर मारलेल्या या चेंडूचा क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. गायकवाडने नवीन नियमांनुसार नो बॉलसाठी रिव्ह्यू मागितला, परंतु पंचांनी टीव्ही अंपायरशी चर्चा केल्यानंतर चेंडू कंबरेच्या खाली असल्याचे म्हटले आणि गायकवाडला डगआउटकडे परत जावे लागले. पण ऋतुराज आऊट होताच चाहत्यांनी मात्र तो आऊट नसल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

ऋतुराजला टाकण्यात आलेला चेंडू हा सरळ स्पष्ट नो बॉल असल्याचे म्हटले जात आहे. ऋतुराजच्या चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी नो बॉल असल्याचे म्हणत ट्विट आणि आणि आयपीएलच्या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here