लखनऊ: आयपीएल २०२३ मधील पहिला डबल हेडर आज १ एप्रिल रोजी खेळवला जात आहे. पहिला सामना आज दुपारी पंजाब किंग्ज आणि कोलकता नाईट रायडर्समध्ये सुरु आहे. तर आज संध्याकाळी दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाईल. आयपीएलमधील हा तिसरा सामना लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० पासून सुरु होईल. तत्पूर्वी या सामन्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व यंदा डेव्हिड वॉर्नरकडे असेल तर लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलकडे असेल. लखनऊच्या घरच्या मैदानाचा म्हणजेच एकना स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाचा अंदाज जाणून घेऊया.
PBKS vs KKR Live Score: पंजाबविरुद्धच्या लढतीत कोलकाताने टॉस जिंकला आणि प्रथम…
पिच रिपोर्ट

या मैदानाची खेळपट्टी काळी माती आणि लाल मातीने बनलेली आहे, त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करणे सोपे जाते. एकना स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळते. त्याचवेळी, नाणेफेक जिंकल्यानंतर, संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे सोयीचे ठरते कारण संघाला प्रथम स्कोअर बोर्डवर मोठे लक्ष्य उभारायचे असते. जसजसा खेळ पुढे सरकतो तसतशी खेळपट्टीची गती मंदावते, त्यामुळे स्पिनरला येथे चांगला टर्न आणि बाउन्स मिळतो.

या मैदानावर एकूण ६ टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ सामने जिंकले आहेत, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने एक सामना जिंकला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी १७२ च्या आसपास आहे.

इम्पॅक्ट प्लेयरयला खेळवणं चेन्नईला पडलं महागात, ठरला संघाच्या पहिल्याच पराभवाचे मोठं कारण
हवामानाचा अंदाज

लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पावसामुळे सामना विस्कळीत होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी पावसाची २० टक्के शक्यता आहे. सध्या लखनऊमध्ये पाऊस पडत आहे. मात्र, सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसे झाले नाही तर लखनऊमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पावसाची शक्यता असू शकते.

हेड टू हेड रेकॉर्ड

गेल्या मोसमात पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २ सामने खेळले गेले आहेत आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. लखनऊविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीला ६ धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

दोन्ही संघांचे रेकॉर्ड पाहता लखनऊ सुपर जायंट्सचा संघ वरचढ असल्याचे दिसत आहे. पण दिल्ली कॅपिटल्सची कमानही यंदा नव्या आणि अनुभवी कर्णधाराच्या हातात आहे. त्यामुळे कोणता संघ सामना जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड

कशी असू शकते दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (LSG vs DC Probable Playing 11)

लखनऊ सुपर जायंट्स –
केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स –
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, रिले रोसो, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, अमन खान, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here