मोहाली: आयपीएल २०२३च्या दुसऱ्या लढतीत पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर ७ धावांनी विजय मिळवला. या लढतीचा निकाल पावसामुळे DRS नियमानुसार लागला असला तरी लढतीवर पंजाबचे नियंत्रण होते. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने कोलकाताला १९२ धावांचे मोठे आव्हान दिले होते. या मॅचमध्ये पंजाबच्या एका गोलंदाजाची मोठी चर्चा झाली. अर्शदीप सिंगने पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची पोलखोल केली. मॅचच्या स्वत:च्या पहिल्याच ओव्हरमध्ये अर्शदीपने दोन विकेट घेतल्या. या दोन्ही विकेट त्याने शॉर्ट चेंडूवर घेतले. अर्शदीपने दिलेल्या या दोन झटक्यातून केकेआरचा संघ सावरू शकला नाही. खरतर कोलकाताने पहिल्याच ओव्हरमध्ये १३ धावा करत जोरदार सुरुवात केली होती. मात्र अर्शदीपने केकेआरचा हा आनंद फार काळ टीकू दिला नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने फक्त ४ धावा दिल्या आणि दोन विकेट मिळवल्या.

IPL 2023: उत्साहाच्या भरात रवी शास्त्री काय बोलू गेले पाहा, हार्दिक पंड्या देखील गोंधळला
मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर मनदीप सिंगला माघारी पाठवले. ३ चेंडूत २ धावा करणाऱ्या मनदीपला शॉर्ट चेंडूवर पुल करण्याचा मोह झाला आणि डीप स्क्वेअर लेगवर सॅम करनने त्याचा सोपा कॅच घेतला. मनदीपच्या जागी आलेल्या अनुकूल रॉयने ओव्हरचा दुसरा आणि त्याचा पहिला चेंडू डॉट खेळला आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला.

PBKS vs KKR Highlights: पावसाने पंजाबचा विजय सोपा केला; DRSने कोलकाताचा थोडक्यात पराभव
ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या अर्शदीपला ही गोष्ट आवडली नाही त्याने पुढच्या चेंडूवर अनुकूल बाद केले. ही विकेट मिळवल्यानंतर त्याने जल्लोष केला नाही तो फक्त अनुकूलकडे टशन देत पाहत राहिला. अर्शदीपच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला.


मॅचमध्ये पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज भानुका राजपक्षेने ३३ चेंडूत ५० धावा केल्या. तर कर्णधार शिखर धवनने ४० धावांचे योगदान दिले. त्यांनी २० षटकात १९१ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सची अडखळत सुरुवात झाली. पावसामुळे मॅच थांबवली तेव्हा त्यांनी १६ षटाकत ७ बाद १४६ धावा केल्या होत्या, ज्या विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. पंजाबला DRS नियमानुसार ७ धावांनी विजयी घोषीत केले.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here