मुंबई: टीम इंडियाचा एक धडाकेबाज खेळाडू IPL 2023 दरम्यान क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. टीम इंडियानंतर या क्रिकेटरला आता आयपीएल 2023 मध्येही खेळण्याची संधी दिली जात नाहीये. टीम इंडियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आली आहे. निवडकर्त्यांनी टीम इंडियाच्या या खेळाडूची निवड न करता त्याला संघातून बाहेर ठेवलं. तसेच, निवड समितीला यापुढे या खेळाडूला संधी देण्यात रस नाही, असं दिसतंय. त्यामुळे आता या खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन जवळपास अशक्य झालं आहे. टीम इंडियाचा हा खेळाडू कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. कारण, आता त्याच्याकडे आणखी कुठलाही पर्याय राहिलेला नाही. हा खेळाडून आणखी कोणी नाही तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आहे.

वडील इलेक्ट्रिशियन, क्रिकेट किटसाठी उधारी; कोचचा आधार, आता मुलाची IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी
आयपीएल २०२३ मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघाने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात इशांत शर्माला संधी दिली नाही. ज्यामुळे हे स्पष्ट झाले की, आता हा वेगवान गोलंदाज संपूर्ण आयपीएल २०२३ हंगामात बेंचवरच दिसेल. दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनाला इशांत शर्मावर अजिबात विश्वास नसल्याचं चित्र आहे. इशांत शर्माने त्याचा शेवटचा आयपीएल सामना मे २०२१ मध्ये खेळला होता. इशांत शर्माने नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

मार्क वूड ठरला IPL 2023 मधील ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज !

करिअर जवळजवळ संपलं

टीम इंडियात आता मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारख्या वेगवान गोलंदाजांचं त्रिकूट आहे. चौथा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे भारतीय निवडकर्त्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. त्यामुळेच इशांत शर्माला टीम इंडियात पुन्हा संधी मिळणे शक्य दिसत नाही. टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

पेण ते पनवेल ४५ मिनिटांचा थरार, वनविभागाने समुद्राच्या पोटातील ३० टन वजनी खजिना पकडला, किंमत…
आयपीएलमध्येही संधी नाही, पहिल्या सामन्यात बेंचवर

टीम इंडियाशिवाय इशांत शर्माला आयपीएलमध्येही संधी दिली जात नाहीये. इशांतने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७२ विकेट घेतल्या आहेत. तर १२ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.

टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारखे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत इशांत शर्माला टीम इंडियातून वगळण्यात आलं आहे. इशांत शर्मा हा नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कानपूर कसोटीत अखेरचा दिसला होता. त्या सामन्यात इशांत शर्माला एकही विकेट मिळवता आली नव्हती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

  1. I’m curious to find out what blog system you’re working with?
    I’m experiencing some small security problems with my latest website and I’d like to find
    something more secure. Do you have any suggestions?

    Here is my page: online casino real money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here