नवी दिल्ली: गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. आयपीएल २०२३ मधील आतापर्यंत झालेले सलग दोन सामने त्यांनी जिंकले आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आश्चर्यकारक कामगिरी केली. अल्झारी जोसेफने आपल्या वेगवान गोलंदाजीने दिल्ली कॅपिटल्सच्या २ विकेट्स घेतल्या. आता तुम्ही विचार करत असाल की अल्झारी जोसेफने फक्त दोन विकेट घेतल्या आहेत, मग त्यात मोठी गोष्ट काय आहे? पण अल्झारी जोसेफने टाकलेली चार षटकेदिल्ली कॅपिटल्सला हादरवून सोडणारी होती. त्याच्या वेगानं घेतलेल्या विकेट्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. अल्झारी जोसेफने डेव्हिड वॉर्नरला आपला पहिला बळी बनवले. त्याने वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. मोठी गोष्ट म्हणजे पुढच्याच चेंडूवर जोसेफने रिले रुसोला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रुसोला जोसेफने सर्वोत्तम बाऊन्सरवर बाद केले. जोसेफचा वेगवान उसळणारा चेंडू रूसोला हाताळता आला नाही आणि तो चेंडू कळण्याधीच जाऊन रुसोच्या हेल्मेटला जाऊन धडकला. पॉइंटवर उभ्या असलेल्या राहुल तेवतियाने त्याचा अप्रतिम झेल घेतला. रुसोला काहीच करता आले नाही आणि तो तसाच पॅव्हेलियनमध्ये परतला.

गुजरात टायटन्सच्या विजयाचा हिरो ठरलेला साई सुदर्शन आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती
अल्झारी जोसेफचा चेंडू थेट हेल्मेटवर

अल्झारी जोसेफने यानंतर दिल्ली कॅपिटल्सला दणाणून सोडले. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने दिल्लीच्या दोन फलंदाजांच्या हेल्मेटला धडक दिली. प्रथम त्याने बाउन्सर चेंडूने सरफराज खानच्या हेल्मेटला धडक दिली आणि त्यानंतर अलझारीने नवोदित अभिषेक पोरेलसोबतही असेच केले.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज वेगवान गोलंदाजीसमोर गोंधळताना दिसत आहेत. गेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने दिल्लीला हादरवले. त्या सामन्यात वुडने पाच विकेट घेतल्या होत्या. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शला स्वस्तात परतीचा रस्ता दाखवला आणि बाकीचे काम अल्झारी जोसेफने केले. वेगवान गोलंदाजांसमोर दिल्लीचे फलंदाज टिकत नसून या कमकुवतपणाचा फायदा येत्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघ नक्कीच करून घेतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here